‘अफझल खानाचा वध’ हा देखावा दाखवण्यास अखेर परवानगी; पहा काय म्हणाले पोलीस?
पुण्यातील कोथरूड पोलिसांनी संगम मित्र मंडळाला गणेशोत्सवात छञपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा दाखवण्यास परवानगी नाकारली होती. यावरून मोठा वाद उफाळून आला होता. अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली होती. अखेर मोठ्या विरोधानंतर पुणे पोलिसांनी अफझल खानाच्या वधाचा देखावा दाखवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे संगम तरुण गणेश मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. […]
ADVERTISEMENT
पुण्यातील कोथरूड पोलिसांनी संगम मित्र मंडळाला गणेशोत्सवात छञपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा दाखवण्यास परवानगी नाकारली होती. यावरून मोठा वाद उफाळून आला होता. अनेकांनी पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली होती. अखेर मोठ्या विरोधानंतर पुणे पोलिसांनी अफझल खानाच्या वधाचा देखावा दाखवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे संगम तरुण गणेश मंडळाने आनंद व्यक्त केला आहे. सोबत परवाना शर्तीचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे पोलिसांनी?
आपले 11 ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या पत्राच्या अनुषंगाने 20 ऑगस्ट रोजी देण्यात आलेलं पत्र मागे घेण्यात येत आहे. आपणास गणेशोत्सवच्या अनुषंगाने आलेल्या परवाना शर्तीचा भांग होणार नाही , याची दक्षता घ्यावी. असं म्हणत कोथरूड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी देखाव्यासाठी परवानगी दिली आहे. संगम मित्र मंडळ, कोथरूडच्या अध्यक्ष किशोर शिंदेंच्या नावाने हे पत्र देण्यात आले आहे.
हे वाचलं का?
काय होतं प्रकरण?
पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कोरोनाच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्षात पुण्यातील गणेशात्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने विविध गणेश मंडळ गणेश उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. त्यापैकी कोथरूड येथील संगम चौकातील संगम मित्र मंडळाने यंदा अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा दाखवण्याचा निर्णय केला होता. मात्र पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सांगत परवानगी नाकारली होती.
ADVERTISEMENT
त्यामुळे या मंडळाने नाराजी व्यक्त केली होती. शिवाजी महाराजांचा इतिहास भारतात नाहीतर पाकिस्तानात दाखवायचा का? असा प्रश्न मंडळाकडून निर्माण करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे मागणी करण्यात आली होती. यादरम्यान पोलिसांच्या या भूमिकेवर विविध स्तरावरून टीका करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
विविध स्तरावरून झाला होता विरोध
आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या नावावर आलेल्या या सरकारमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यासाठी विरोध का? असा सवाल उपस्थित केला होता. पोलिसांनी परवानगी नकारल्याच्या निर्णयाविरोधात ब्राह्मण महासंघाकडून बुधवारी निवेदन देण्यात आले होते. या देखाव्यावरुन राजकीय वाद पेटण्याची शक्यता होती. अनेक स्तरावर या देखाव्यासंदर्भात बोललं गेलं होतं. मात्र आता हे गणपती मंडळ अफझल खानाचा वध हा जिवंत देखावा साकारणार असल्याचं, मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT