किच्चा सुदीप म्हणाला हिंदी राष्ट्रभाषा नाही! अजय देवगण भडकला आणि म्हणाला…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला सुप्रसिद्ध व्हिलन किच्चा सुदीप याने एक वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून अजय देवगण चांगलाच भडकला आणि त्याने किच्चा सुदीपला खडे बोल सुनावले. ज्यानंतर सुदीपने आपलं वक्तव्य वेगळ्या प्रकारे मांडलं गेलं असं म्हटलं. आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

एकीकडे दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा चांगलाच वाढतो आहे. तर दुसरीकडे भाषेवरून एक वाद सुरू झाला आहे. या वादाची सुरूवात झाली ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीतले सुप्रसिद्ध व्हिलन किच्चा सुदीप यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे. कर्नाटक तकला दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी राष्ट्रभाषेबाबत सुदीप म्हणाला की, ”हिंदी ही ही आपली राष्ट्रभाषा नाही. पॅन इंडिया सिनेमा कानडीतही तयार होत आहेत. याबाबत मी एक करेक्शन करू इच्छितो. हिंदी आता राष्ट्रभाषा नाही. आज बॉलिवूडमध्ये पॅन इंडिया सिनेमा तयार होत आहेत. बॉलिवूडमध्ये तेलुगू आणि तमिळ सिनेमांचे रिमेक बनत आहेत. तरीही त्यांचं स्ट्रगल संपलेलं नाही. आम्ही असे सिनेमा बनवतो जो जगभरात पाहिले जातात”

हे वाचलं का?

किच्चा सुदीपने हे वक्तव्य केल्यानंतर हिंदीतला सुपरस्टार अजय देवगण चांगलाच भडकला. तो ट्विट करून सुदीपला म्हणाला की “किच्चा सुदीप, भावा तू म्हणतोस हिंदी राष्ट्रभाषा नाही मग तुमच्या मातृभाषेतले सिनेमा तुम्ही हिंदीत डब करून का रिलिज करता? हिंदी आमची मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा आहे आणि नेहमीच राहिल. जन गण मन” असं ट्विट अजय देवगणने करत सुदीपला खडे बोल सुनावले.

ADVERTISEMENT

यानंतर सुदीपने अजय देवगणला रिप्लाय करत अजय देवगणला प्रत्युत्तर दिलं. किच्चा सुदीप म्हणाला, “सर, मी ज्या संदर्भाने बोललो ते माझं म्हणणं खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही घेतलंय असं दिसतंय. मी कदाचित आणखी चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर ठेवू शकतो जेव्हा आपली भेट होईल. मला जे म्हणायचं होतं त्याचा अर्थ असा मुळीच नव्हता की मी कुणाच्या भावना दुखावेन. माझ्या वक्तव्यातून मला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. मी असं का करेन सर? ” असं किच्चा सुदीपने म्हटलं.

ADVERTISEMENT

यानंतर आणखी एका ट्विटमध्ये सुदीप म्हणतो, “मी आपल्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मी हा विषय वाढवू इच्छित नाही. हा विषय इथेच सोडून देऊ. मी आधीही म्हटलं तेच सांगेन, मला तसं म्हणायचं नव्हतं जे सांगितलं जातं आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा”

यानंतर अजय देवगणनेही ट्विट केलं आहे. अजय देवगण म्हणाला, “भावा तू मित्र आहेस तू सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यास ते बरं झालं. आपण सगळे सिनेसृष्टी म्हणून एकच आहोत. आपण सगळे सगळ्या भाषांचा आदर करतो. तसंच प्रत्येक कलाकाराचाही आदर करतो. कदाचित भाषांतरात काहीतरी कमतरता राहिल्या असतील”

यानंतर किच्चाने आणखी एक ट्विट अजय देवगणला उद्देशून केलं आहे. भाषांतर आणि बोलण्याचा काय अर्थ काढला जातो हे व्यक्तीपरत्वे आहे सर. पण मी तुम्हाला कोणताही दोष देणार नाही सर. उलटपक्षी मला या गोष्टीचा जास्त आनंद होईल की तुम्ही मला एखाद्या क्रिएटिव्ह गोष्टीबाबत टॅग करून ट्विट केलं. Love and Regards असं म्हणत सुदीपने अजय देवगणला उत्तर दिलं आहे आणि वादावर पडदा टाकला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT