सूक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार? Ajit Pawar यांचा Narayan Rane यांना टोला
सूक्ष्म आणि लहान यामध्ये काय निधी मिळणार? निधी हवा असेल तर गडकरींकडे असलेलं खातं महत्त्वाचं आहे असं म्हणत नारायण राणे यांना मिळालेल्या खात्यावर अजित पवार यांनी टोला लगावला आहे. अनिल परब यांचं रेकॉर्डिंग समोर आलं असता त्याबाबत मला थेट काही भाष्य करता येणार नाही. पालकमंत्री म्हणून जे योग्य असेल ते आदेश मिळाले असतील असं अजित […]
ADVERTISEMENT

सूक्ष्म आणि लहान यामध्ये काय निधी मिळणार? निधी हवा असेल तर गडकरींकडे असलेलं खातं महत्त्वाचं आहे असं म्हणत नारायण राणे यांना मिळालेल्या खात्यावर अजित पवार यांनी टोला लगावला आहे. अनिल परब यांचं रेकॉर्डिंग समोर आलं असता त्याबाबत मला थेट काही भाष्य करता येणार नाही. पालकमंत्री म्हणून जे योग्य असेल ते आदेश मिळाले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. नारायण राणे यांनी जे भाष्य केलं त्यानंतर अटकेची कारवाई झाली. त्यांना राज्यात फिरायला सांगितलं आहे हे मान्य आहे पण त्यांनी जपून बोललं पाहिजे होतं असंही मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.
नारायण राणे यांच्यावर लगेच कारवाई झाली नाही हे लक्षात घ्या. कोर्टाने सांगितल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. सगळ्या राजकीय पक्षांना माझं आवाहन आहे की सुसंस्कृत राजकारण करण्याचं भान ठेवलं पाहिजे असंही अजित पवार यांनी सांगितलं. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी अजित पवार आले होते. त्यावेळी पुण्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू झाल्यापासूनच चर्चेत आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर जामीनही मिळाला. याबाबत आज आढावा बैठकीसाठी पुण्यात आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी प्रत्येक पक्षाने सुसंस्कृत राजकारण केलं पाहिजे असं आवाहन केलं आहे.
आणखी काय म्हणाले अजित पवार?










