Ajit Pawar: ‘हा निर्लज्जपणाचा कळस…’, सत्तारांवर अजित पवार संतापले!
वाशिममधील गायरान जमीन वाटप प्रकरण अब्दुल सत्तारांच्या अंगलट आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने गंभीर शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तारांना सुनावलं. त्याचे पडसाद विधानसभेत आज उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या गोष्टीसाठी तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला. मुंबई उच्च […]
ADVERTISEMENT

वाशिममधील गायरान जमीन वाटप प्रकरण अब्दुल सत्तारांच्या अंगलट आलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने गंभीर शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तारांना सुनावलं. त्याचे पडसाद विधानसभेत आज उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी संपूर्ण प्रकरणाची पोलखोल करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच या गोष्टीसाठी तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांवर संताप व्यक्त केला.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने वाशिम येथील गायरान जमीन प्रकरणात अब्दुल सत्तारांना नोटीस बजावली. या प्रकरणात कोर्टाने सत्तारांवर ताशेरे ओढले आहेत. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते अजित पवारांनी उपस्थित करत अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधक या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाल्यानं सत्तारांचा राजीनामा शिंदे-फडणवीस घेणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
गायरान जमीन घोटाळा : अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी, वाचा अजित पवार विधानसभेत काय म्हणाले?
अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले, “परवा याच सभागृहात मुख्यमंत्र्यांनी एनआयटी प्रकरणात दिलेल्या निर्णयासंदर्भात त्यांचं मत दिलं होतं. परंतु आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंठपीठाने राज्याचे विद्यमान कृषीमंत्र्यांच्या विरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. ते ज्यावेळी महसूल राज्यमंत्री होते, त्यावेळी पदाचा गैरवापर केला.”
अब्दुल सत्तार गोत्यात; कोर्टाचे ताशेरे, अधिवेशनात गाजणार ‘जमीन घोटाळा’