“इतके दिवस आपण समजत होतो मुख्यमंत्री सर्वोच्च”, अजित पवारांनी छेडला राजीनाम्याचा मुद्दा
Ajit Pawar, eknath shinde, chandrapur dcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती आदेशाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का दिला. याच प्रकरणावरून विधानसभेत अजित पवारांचा पारा चढला. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती सांगावी अशी मागणी केली. विधानसभेत बोलताना अजित […]
ADVERTISEMENT

Ajit Pawar, eknath shinde, chandrapur dcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरती आदेशाला स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का दिला. याच प्रकरणावरून विधानसभेत अजित पवारांचा पारा चढला. अजित पवारांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी वस्तुस्थिती सांगावी अशी मागणी केली.
विधानसभेत बोलताना अजित पवार म्हणाले, “राज्याचे सहकार मंत्री अतुल सावेंनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी भरती करण्याला परवानगी दिली होती. त्यानुसार 29 नोव्हेंबर 2022 ला सहकार मंत्र्यांकडून तसे आदेश काढले गेले. राज्यातील कोणत्याही मंत्र्यांनी घेतलेला अर्ध न्यायिक निर्णय बदलण्याचा किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप करण्याचा कोणताही विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही, असे असताना सहकारी मंत्री अतुल सावे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसंदर्भात दिलेल्या निर्णयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्थगिती दिली.”
याच मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीला स्थगिती दिल्यानंतर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने नागपूर खंठपिठात याचिका दाखल केली. नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांच्या खात्यामध्ये ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांच्या या कार्यपद्धतीवर उच्च न्यायालयाने कठोर शब्दात ताशेरे ओढले”, असं सभागृहात सांगितलं.
आशिष शेलार-भास्कर जाधवांमध्ये शाब्दिक चकमक, नार्वेकर म्हणाले…