आकाश अंबानींच्या खांद्यावर रिलायन्स जिओची जबाबदारी; बोर्डावर ‘या’ सदस्यांची वर्णी
देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये (Reliance Group) कंपनीचे अधिकार पुढच्या पिढीला देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच क्रमाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या टेलिकॉम युनिट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. रिलायन्स जिओ आता […]
ADVERTISEMENT
देशातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स ग्रुपमध्ये (Reliance Group) कंपनीचे अधिकार पुढच्या पिढीला देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. याच क्रमाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओच्या टेलिकॉम युनिट बोर्डाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या जागी आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओच्या बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
रिलायन्स जिओ आता पुढच्या पिढीकडे
रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (Reliance Jio Infocom Ltd) मंगळवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली. 27 जून रोजी बाजार बंद झाल्यानंतरच मुकेश अंबानी यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले आहे. कंपनीने आकाश अंबानी यांना बोर्डाचे अध्यक्ष बनवल्याचीही माहिती दिली आहे. “कंपनीच्या संचालक मंडळाने कार्यकारी संचालक आकाश अंबानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे,” असे त्यात म्हटले आहे.
हे वाचलं का?
मुकेश अंबानी जिओ प्लॅटफॉर्म्सचे अध्यक्ष म्हणून कायम राहणार
ब्राउन युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या आकाश अंबानींपूर्वी त्यांचे वडील मुकेश अंबानी रिलायन्स जिओचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते. मुकेश अंबानी यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा आणि आकाश अंबानी यांची नियुक्ती हे कपंनीचे नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवताना दिसत आहे. मात्र, मुकेश अंबानी हे Jio Platforms Limited चे चेअरमन म्हणून कायम राहणार आहेत.
ADVERTISEMENT
या लोकांनाही दिले बोर्डावर स्थान
ADVERTISEMENT
आकाश अंबानी सोबतच अतिरिक्त संचालक म्हणून रामिंदर सिंग गुजराल आणि केव्ही चौधरी यांच्या नियुक्तीलाही बोर्डाने मान्यता दिली. या दोघांची 05 वर्षांसाठी स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रिलायन्स जिओच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पंकज मोहन पवार यांची नियुक्ती करण्यासही बोर्डाने मान्यता दिली आहे. ही नियुक्ती 27 जून 2022 पासून पुढील 05 वर्षांसाठी आहे. या नियुक्त्यांना भागधारकांची मंजुरी मिळणे बाकी आहे.
मुकेश अंबानींची ही यशस्वी स्कीम
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ब्लूमबर्गच्या अहवालात असे म्हटले होते की मुकेश अंबानी हा व्यवसाय पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या तयारीत आहेत. तेलापासून दूरसंचारपर्यंत पसरलेल्या या व्यवसायासाठी मुकेश अंबानी एकापाठोपाठ एक वॉल्टन कुटुंबाच्या मार्गावर चालण्याच्या तयारीत असल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वॉलमार्ट इंक चे संस्थापक सॅम वॉल्टन यांनी नेतृत्व पुढच्या पिढीकडे देण्याचे अगदी सोपे मॉडेल स्वीकारले आहे. ‘कुटुंब केंद्रस्थानी ठेवा, पण व्यवस्थापनाचे नियंत्रण वेगवेगळ्या लोकांच्या हातात ठेवा’ हा त्यांच्या मूळ मंत्र आहे.
धीरूभाई यांच्या जयंतीनिमित्त दिली माहिती
गेल्या वर्षी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुकेश अंबानी यांनी प्रथमच नेतृत्व पुढच्या पिढीकडे देण्याचे भाष्य केले होते. याबाबत ते म्हणाले होते की, आता रिलायन्सचे नेतृत्व बदलण्याची गरज आहे. आपल्या मुलांवर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले होते की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) येत्या काही वर्षांत जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि मजबूत कंपन्यांपैकी एक असेल.
मुकेश अंबानी यांनी 2002 मध्ये सूत्रे हाती घेतली
वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मोठा भाऊ मुकेश अंबानी यांनी 2002 मध्ये रिलायन्सचे अध्यक्षपद स्वीकारले. धीरुभाईंच्या पुढच्या पिढीचे भविष्य फार काही चांगले राहिले नाही. दोघा भावांमध्ये टोकाचे वाद झाले आणि पर्यायाने रिलायन्स गटात विभाजन झाले. मुकेश अंबानींना हिच परिस्थिती टाळायची आहे. त्यांची तीन मुले, आकाश, ईशा आणि अनंत हे रिलायन्सच्या टेलिकॉम, रिटेल आणि एनर्जी व्यवसायात गुंतलेले आहेत. मुकेश अंबानी एकदा त्यांच्या मुलांबद्दल म्हणाले होते, ‘मला यात शंका नाही की आकाश, ईशा आणि अनंत हे तिघेही पुढच्या पिढीचे नेृतृत्व बनून रिलायन्सला आणखी उंचीवर नेतील.’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT