“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातंय असं वाटतं”; जितेंद्र आव्हाडही संतापले
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर दुसरी गोष्ट म्हणजे याच मुद्द्यावरून त्याला ट्रोल केलं जातंय. अक्षय कुमाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक प्रेक्षकांना आवडलेला नाही. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षयपेक्षा अभिनेता शरद केळकर भारी दिसतो, […]
ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दोन गोष्टींमुळे चर्चेत आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो वेडात मराठे वीर दौडले सात चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर दुसरी गोष्ट म्हणजे याच मुद्द्यावरून त्याला ट्रोल केलं जातंय. अक्षय कुमाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक प्रेक्षकांना आवडलेला नाही. त्यात आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अक्षयपेक्षा अभिनेता शरद केळकर भारी दिसतो, असा सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासकालीन फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लुक रिलीज करण्यात आलाय.
अक्षय कुमारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लुकचा फोटो आणि टीझर सोशल मीडियावरून शेअर केला. मात्र, त्यानंतर त्याला ट्रोल केलं जात आहे. अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील लुक लोकांना आवडलेला नाही, असाच सूर समाजमाध्यमांवर उमटला आहे.
For me Only Sharad Kelkar Sir for Chatrapati Shivaji Maharaj's Role?@SharadK7 . He is the finest actor ? https://t.co/MCVoLvBud1
— JD° ??? (@JayDhanavade13) December 6, 2022