अमित शाहांनी सांगितली राम मंदिर पूर्ण होण्याची तारीख; म्हणाले, ‘तिकीट बुक करा’
गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आप ही निवडणुकीच्या मैदानात आहे. गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, आजतकच्या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राम मंदिर पूर्ण होण्याची तारीखही सांगितली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आम्ही 1950 पासून हे म्हणत आलोय की, कलम 370 […]
ADVERTISEMENT

गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक होत असून, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आप ही निवडणुकीच्या मैदानात आहे. गुजरातमधील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असून, आजतकच्या कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राम मंदिर पूर्ण होण्याची तारीखही सांगितली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “आम्ही 1950 पासून हे म्हणत आलोय की, कलम 370 संपवू. हे काम नरेंद्र मोदींनी केलं. आम्ही म्हणत होतो, ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला, त्याच भूमीवर मंदिर व्हावं व्हावं. काँग्रेसचे लोक आम्हाला टोमणे मारायचे. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे असं म्हणायचे. तारीख सांगण्याची गरज नाही. जानेवारी २०२४ मध्ये मंदिराचं काम पूर्ण होईल.”
“जानेवारी २०२४ चं तिकीट बुक करा. अयोध्येत भव्य राम मंदिर त्याच जागेवर बनत आहे, ज्याचं आम्ही वचन दिलं होतं”, असं शाह म्हणाले.
vedanta foxconn : अनेक प्रकल्प महाराष्ट्रात गेले, मग गुजरात रडणार का? अमित शाहंचा सवाल
ट्रिपल तलाक ते भारतीय अर्थव्यवस्था, अमित शाह काय म्हणाले?
“आम्ही ट्रिपल तलाक संपवण्याचं म्हणत होतो. आम्ही ते करून दाखवलं. आता समान नागरी कायद्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याची सुरूवात झालेली आहे. आम्ही म्हणायचो की, देशाची अर्थव्यवस्था जगातल्या टॉप ५ मध्ये असेल. आज आपण ५व्या स्थानी आहोत. अनेक वित्तीय संस्थांनी अशा अंदाज व्यक्त केलाय की, २०२६ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या स्थानावर पोहोचेल”, असंही अमित शाह म्हणाले.
गुजरातचे मुख्यमंत्री होणार का? अमित शाहांनी काय दिलं उत्तर?
यावेळी आपण गुजरातचे मुख्यमंत्री होणार का? असा प्रश्नही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विचारण्यात आला. यावर शाह म्हणाले, “असं होऊ शकत नाही. माझीही अशी इच्छा नाहीये. माझा पक्ष आणि पक्षातील लोकांनाही हे अशक्य वाटतं.”
सध्या पक्षात तुमचं स्थान दुसऱ्या क्रमांकावर आहे, या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले, “सरकारमध्ये एक नंतर कोणताही नंबर नसतो. एक नंबरवर नरेंद्र मोदी आहे. त्यानंतर नंबर नाहीये. सर्व समान आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही का करतो. जे लोक नंबरच्या शर्यतीत पडू इच्छित आहे, त्यांना मी सांगू इच्छितो की, यात पडू नका. यात अडचणी असतात.”