Amitabh: अभिव्यक्तीवर पहिल्यांदाच बोलले बिग बी, कोणाच्या वर्मी बसला वार?
Amitabh Bachchan Statement on Freedom of speech कोलकाता: ‘देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. पण आजही नागरिकांचं स्वातंत्र्य आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या याच विधानानं देशभर खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल (Freedom of speech) बोलत आले आहेत. (amitabh […]
ADVERTISEMENT
Amitabh Bachchan Statement on Freedom of speech कोलकाता: ‘देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. पण आजही नागरिकांचं स्वातंत्र्य आणि बोलण्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.’ बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या याच विधानानं देशभर खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते हे वारंवार अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल (Freedom of speech) बोलत आले आहेत. (amitabh bachchan gave such a statement on freedom of expression in bengal bjp attack on mamata banerjee)
ADVERTISEMENT
मात्र, आतापर्यंत कोणत्याही वादात न पडणाऱ्या बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी आता स्वातंत्र्याबाबत उल्लेख केल्यानं देशभर त्याची चर्चा सुरु झाली आहे. गुरुवारी (15 डिसेंबर) कोलकाता फिल्म फेस्टिवलमध्ये अमिताभ बच्चन यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे आता नवा वाद निर्माण झाला आहे. खरं तर आपल्या भाषणात अमिताभ यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा नेमका रोख कोणाकडे आणि त्यांनी कोणाला सुनावलंय वरुन आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या या वक्तव्यानंतर याच कार्यक्रमात बोलताना प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, ‘असं बोलायला हिंमत लागते’, असं म्हणत त्यांन अमिताभ बच्चन यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.
हे वाचलं का?
Kangana Ranaut: ‘1947 साली स्वातंत्र्य नाही तर भीक मिळाली, खरं स्वातंत्र्य 2014 साली मिळालं’, कंगनाचं वादग्रस्त विधान
तर, दुसरीकडे भाजपनं ममता दीदींवरच हल्लाबोल केला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी अमिताभ बच्चन यांच्या विधानाचं कनेक्शन ममता बॅनर्जींशी जोडलं आहे.
ADVERTISEMENT
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे की, ‘अमिताभ बच्चन यांचं हे विधान पश्चिम बंगालसाठी चपखल बसतं. हे विधान जिथं केलं, तिथं निवडणुकीनंतर सर्वाधिक हिंसाचार होतो. याचवेळी मंचावर ममता बॅनर्जी होत्या.’
ADVERTISEMENT
Rss, भाजपचा स्वातंत्र्य लढ्यात काडीचा संबंध नव्हता, उद्धव ठाकरेंनी सुनावलं; राहुल गांधींवरही ताशेरे
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानच्या पठाण सिनेमावरून बॉयकॉटचे ट्रेंड चालवले जात असतानाच अमिताभ बच्चन यांचं हे विधान समोर आलं आहे. याच कार्यक्रमात शाहरूख खानच्याही एका विधानाची खूप चर्चा होत आहे.
अमिताभ बच्चन यांच्या एका वाक्यावरुन आता राजकीय नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे आता अमिताभ बच्चन यांनी नेमकं कोणाला सुनावलं आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करुन जरुर सांगा.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT