नुपूर शर्मांचं समर्थन केल्याने अमरावतीचे व्यावसायिक उमेश कोल्हेंची हत्या? वाचा सविस्तर
अमरावती (Amravati) या ठिकाणी एका व्यापाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. आता यामागची एक नवी बाजू समोर आली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्याने या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरातल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता […]
ADVERTISEMENT
अमरावती (Amravati) या ठिकाणी एका व्यापाऱ्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. आता यामागची एक नवी बाजू समोर आली आहे. नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांचं समर्थन केल्याने या व्यावसायिकाची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरू झाली आहे. अमरावती शहरातल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची २१ जूनच्या रात्री हत्या करण्यात आली. या प्रकरणात आता नुपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? ही मागणी आता भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. त्यामुळेच ही चर्चा आता सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे प्रकरण?
राजस्थानच्या उदयपूरमध्ये जी कन्हैय्या शर्माच्या हत्येची घटना समोर आली तशीच घटना महाराष्ट्रातल्या अमरावतीत झाली आहे. मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या एका विशिष्ट समाजाच्या लोकांनी चायनीज सुरा मारून केली. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच पाच जणांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणातला पेच हा आहे की या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
हे वाचलं का?
पोलीस अधिकारी नीलीमा आरज यांनी सांगितलं की उमेश कोल्हे हत्या प्रकरणातल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र यांचा म्होरक्या पडकला गेलेला नाही. त्यामुळे अद्याप हत्येचं कारण स्पष्ट नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. त्याला पकडण्यात आल्यानंतरच हत्येचं कारण कळू शकेल असंही त्यांनी सांगतिलं.
महाराष्ट्रातल्या अमरावती या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाणे भागात येणाऱ्या चर्चच्या मागे २१ जून रोजी अमित मेडिकल चालवणारे व्यापारी उमेश कोल्हे हे आपल्या मुलासह आणि सुनेसह दुकान बंद करून परतत होते. त्यावेळी तीन बाईकस्वारांनी त्यांच्यावर वार केले आणि त्यांची हत्या केली.
ADVERTISEMENT
उमेश कोल्हे यांचा मुलगा आणि सुनेच्या समोरच ही घटना घडली. उमेश कोल्हे यांना तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यानंतर आता उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांचं समर्थन केलं होतं म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप होऊ लागला आहे. नुपूर शर्माला समर्थन देणारी पोस्ट उमेश कोल्हे यांनी त्यांच्या स्टेटसवर ठेवली होती असंही समोर येतं आहे.
ADVERTISEMENT
भाजपनेही या प्रकरणी एनआयने लक्ष घालावं अशी मागणी केली. भाजपचे स्थानिक नेते त्याचप्रमाणे नितेश राणे यांनीही ट्विट करत महाराष्ट्रातही उदयपूरसारखी एका मेडिकल व्यावसायिकाची हत्या घडवून आणली गेली असं ट्विट केलं आहे. उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून त्यांची २१ जूनला हत्या करण्यात आली होती. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित आहे का? याचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे. त्याच अनुषंगाने पोलिसांनी तपासही सुरू केला. मात्र तसा काही अँगल समोर आला नाही. तर दुसरीकडे या प्रकरणी एनआयचे अधिकारी अमरावतीत दाखल झाले आहेत.
या प्रकरणी आत्तापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा जो सहावा आरोपी आहे तोच या प्रकरणाचा सूत्रधार आहे. त्यानेच आम्हाला काम दिलं होतं असं या पाच जणांनी सांगितलं आहे. पोलीस आता या प्रकरणी सहाव्या आरोपीचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे या प्रकरणी भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनीही या प्रकरणाचा तपास एनआयने करावा असं म्हटलं आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येमागे विशिष्ट प्रवृत्तीचा सूत्रधार आहे असं म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी अनिल बोंडे यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं. एनआयएच्या माध्यमातून तपास झाला तर कोल्हे कुटुंबाला न्याय मिळू शकेल असंही अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT