Navneet Rana: रवी राणा-बच्चू कडू वादावर पहिल्यांदा भाष्य, मतभेद सोडून एकत्र येण्याचं आवाहन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा आणि शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद संपला असं वाटत असतानाच तो वाद पुन्हा पेटला. बुधवारी रवी राणा यांनी बच्चू कडूंना आव्हान दिलं. तर बच्चू कडू यांनी प्रतिआव्हान दिलं. अशात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी या वादात पडत दोघांनाही वाद मिटवण्याचं आवाहन केलं आहे.

ADVERTISEMENT

बच्चू कडू आक्रमक होताच मिळालं फळ! शिंदे-फडणवीसांनी मंजूर केला ५०० कोटींचा प्रकल्प

काय म्हटलं आहे नवनीत राणा यांनी?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी कडू व रवि राणा यांच्या वादात अमरावती शहर आणि जिल्ह्यातील विकासाचं नुकसान होतं आहे तरी दोघांनी आपसात वाद न करता समोपचाराने हे प्रकरण घ्यावं. गेल्या अडीच वर्षात आपले सरकार नसल्याने नुकसान झाले पण आता आपल्या विचारांचे सरकार आलं आहे. आपल्याला आता विकास करायचा आहे तेव्हा जिल्ह्याची खासदार म्हणून दोन्ही आमदरांना विनंती करते हे वाद थांबवा. असं आवाहन नवनीत राणा यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहटीला गेले, त्यांच्यावर आरोप…”

अडीच वर्षे आपल्या जिल्ह्याचे प्रश्न रखडले

गेली अडीच वर्षे आपल्या विचारांचं सरकार नव्हतं. मात्र आता आपल्या विचारांचं सरकार आलं आहे. त्यामुळे जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवले पाहिजेत. एक खासदार म्हणून मी दोन्ही आमदारांना विनंती करते की सगळे मतभेद सोडून एकत्र या. आपण जनतेची कामं केली पाहिजेत, त्यासाठी विचार केला पाहिजे अशी विनंतीही नवनीत राणा यांनी केली.

ADVERTISEMENT

दोन्ही आमदारांमधला वाद पुन्हा कसा पेटला?

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत वाद मिटवल्यानंतरही बच्चू कडू यांनी समर्थकांचा मेळावा घेत पुन्हा वैयक्तिक आरोप केल्यास कोथळा बाहेर काढू, असा इशारा दिला होता. त्यावर रवी राणांनीही आक्रमक वक्तव्य करत ‘बच्चू कडू पुन्हा आमदार कसा होणार ते पाहा’ असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यानंतर हा वाद पुन्हा चिघळला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT