आईनं आपल्या 10 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं, घटनेनं कुटुंब हादरले
Crime News : एका महिलेनं आपल्या 10 महिन्यांच्या मुलाला विष पाजलं आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत सुरु असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेनं 10 वर्षांच्या मुलाला विष पाजलं
नंतर महिलेनं स्वत:चं जीवन संपवलं
Crime News : एका महिलेनं आपल्या 10 महिन्यांच्या मुलाला विष पाजलं आणि नंतर स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत सुरु असलेल्या त्रासाला कंटाळून महिलेनं टोकाचं पाऊल उचलल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : शौचासाठी रात्री घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हॅनमध्ये आढळली पीडिता, हादरवून टाकणारी घटना
मृत महिलेचं नाव सुषमा (वय 27) असे आहे. तसेच तिने चार वर्षापूर्वी विवाह केला होता. तिच्या पतीचं नाव यशवंत रेड्डी असे नाव आहे. त्या दोघांनाही 10 महिन्यांचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे. कुटुंबातील सदस्यांनी दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद होत असल्याचं सांगितलं होतं.
पीडितेनं मुलाला विष पाजलं अन् स्वत:चं जीवन संपवलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुषमा ही तिच्या आईच्या घरी एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या खरेदीसाठी आली होती. भेटीदरम्यान, ती तिच्या मुलाला घरातील एका वेगळ्या खोलीत घेऊन गेली, नंतर तिने पहिल्यांदा मुलाला विष पाजलं आणि नंतर तिने जीवन संपवलं. बंद असलेला दरवाजा उघडल्यानंतर सून आणि मुलगा दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : 40 वर्षीय विवाहित प्रियकराचं 25 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध, दोघांनी मिळून वंदेभारत खाली उडी मारत संपवलं जीवन, सुसाईड नोटमध्ये...
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्या तपास सुरु केला. प्राथमिक माहितीनुसार, ही घटना कुटुंबिक वादातून घडल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले आणि नंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी इतरांचे देखील जबाब नोंदवले आहेत. या घटनेचा सविस्तर तपास केल्यानंतर खरं-खोटं काय हे लवकरच समोर येईल, असे सांगण्यात येत आहे.










