अन्नामलाईंनी मुंबई शहरावर केलेल्या वक्तव्यावरून संदीप देशपांडेंचा पलटवार, म्हणाले 'हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी'
Sandeep Deshpande : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे केवळ राज्याचं नाहीतर देशाचं लक्ष लागलं आहे. याचपार्श्वभूमीवर आता ठाकरे बंधु एकत्र आल्याचं चित्र आहे. अशातच आज 11 जानेवारी रोजी रात्री मुंबईच्या दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधुंची एकत्र सभा घेण्यात आली. या सभेला संबोधित करताना संदीप देशपांडे यांनी महायुतीची पिसं काढली. तेव्हा त्यांनी भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राचीच नसून देशातील शहर', असल्याचं वक्तव्य केलं होतं त्यावरून देखील संदीप देशपांडे यांनी भाजपला सुनावलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी', संदीप देशपांडेंचा आण्णामलाईंवर हल्लाबोल
'ठाकरेंची सत्ता आल्यानंतर दीड लाख लोकांना नोकरी'

त्यांनी बोलताना सांगितलं की, 'मुंबई ही मराठी माणसांची आहे. मुंबई महापालिकेवर मराठीच महापौर होणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली 1500 रुपये द्यायचे आणि मत घ्यायची पण आता माझ्या भगिणी हुशार झालेल्या आहेत', असं म्हणत त्यांनी महायुतीला चांगलं सुनावलं. त्यानंतर त्यांनी बोलताना तामिळनाडूच्या आण्णामलाईवर देखील टीकेची तोफ डागली आहे. 'मला त्या लुंगी डान्सवाल्यांना सांगायचं आहे. हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी म्हणत परत पाठवू तुम्हाला. आम्हाला इथं येऊन शहाणपणा नका करू. तुमच्या चेन्नईत हे ऐकायला मिळेल का?', असा प्रश्न उपस्थित केला.
'ठाकरेंची सत्ता आल्यानंतर दीड लाख लोकांना नोकरी'
त्यानंतर त्यांनी ठाकरेंची सत्ता आल्यानंतर येणाऱ्या काळात दीड लाख लोकांना नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होईल. हे खरं आहे, कारण दीड लाख लोकांच्या जागा अद्यापही भरवण्यात आलेल्या नाहीत. तसेच गेल्या काही वर्षांपासून निवडणूक न झाल्याने जे ओरबाडणं सुरु आहे, यामुळे कॉन्ट्रॅक्टर भरले जात आहेत, असं संदीप देशपांडे म्हणालेत. तसेच त्यांनी पुढे बीएसटी संस्था ही महापालिकेत पूर्णपणे मर्ज करावी असं ते म्हणाले होते.
तसेच त्यांनी पुढे एक चार ओळींची कवी कसुमाग्रजांची कविता म्हणाली होती.