शरद पवारांशी युती, भाजप नेत्यांकडून टीका... अजित पवारांनी सगळंच सांगितलं, मुंबई Tak च्या मुलाखतीत दादांची फटकेबाजी

साहिल जोशी

Ajit Pawar Mumbai Tak Interview: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुंबई Tak ला Super Exclusive मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. पाहा ते नेमकं काय-काय म्हणाले.

ADVERTISEMENT

alliance with sharad pawar criticism from bjp leaders ajit pawar explained everything ajit dada candid remarks in mumbai tak interview
मुंबई Tak वर अजित पवारांची महामुलाखत
social share
google news

पुणे: राज्यात 29 महापालिकेसाठी निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. अशावेळी मुंबईसह पुण्यात नेमकं काय होतं याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. एकीकडे भाजपने काही महानगरपालिकांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती केलेली आहे. तर दुसरीकडे भाजपने मात्र या निवडणुकीत अजित पवारांना लांबच ठेवलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये अजित पवार नेमकी काय कमाल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याच सगळ्याबाबत अजित पवारांनी मुंबई Tak ला एक महामुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर त्यांची मतं मांडली.

अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी नेमकी युती का केली? भाजप नेत्यांकडून अजितदादांवर होणाऱ्या टिकेबाबत त्यांना नेमकं काय वाटतं, राज्यातील राजकारणाबाबत अजितदादांची नेमकी भूमिका काय.. या सगळ्या मुद्यावर अजित पवार यांनी मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीत उत्तरं दिली. पाहा या मुलाखतीत नेमकं काय-काय म्हणाले अजित पवार.

अजित पवारांची राष्ट्रवादी (शरद पवार) नेमकी का झाली युती?

'इथे मी एकनाथरावांना पण विचारलं की, भाजप इथे स्वतंत्र लढायचं म्हणत आहे. तर तुम्ही-आम्ही एकत्र यायचं का? ते म्हणाले नाही, माझी भाजपबरोबर चर्चा चालू आहे. एबी फॉर्म द्यायच्या आदल्या दिवशी मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की, आमचं त्यांचं जमत नाही.. आपण एकत्र यायचं का? मी म्हटलं, मी तुम्हाला विचारत होतो एकत्र यायचं का.. आता मी उमेदवार फिक्स केले आहेत. लोकांना कामाला लागा असं सांगितलंय. आता जर एकत्र आलो तर मी किती लोकांना नाराज करेन. त्यांचे फॉर्म भरले गेले, बंडखोरी झाली तर मतांची विभागणी होईल.'

'फॉर्म मागे घेतल्यानंतरही काही लोकं उदय सामंतने माझ्याकडे पाठवली. की, बघा अजून काही मार्ग निघतोय का. शेवटी श्रीरंग बारणे यांनी दोन प्रभागामध्ये अशी युती केली. पुण्यात पण आम्ही तसा प्रयत्न केला. पण पुण्यात काही जमलं नाही. तिथे अडचण झाली.'

हे वाचलं का?

    follow whatsapp