कल्याण-डोंबिवलीत भाजपकडून मतदारांवर पैशांचा पाऊस, शिंदेसेनेचा गंभीर आरोप, दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच जुंपली

मिथिलेश गुप्ता

KDM Mahapalika : डोंबिवलीच्या पूर्व भागातील तुकारामनगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात प्रचार सुरु असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची पाकीटे घरपोहोच करण्यात आल्याचा नागरिकांनी आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

KDM Mahapalika
KDM Mahapalika
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपने पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा

point

घटनास्थळी एकच गोंधळ

KDM Mahapalika News : डोंबिवलीच्या पूर्व भागातील तुकारामनगर परिसरातील दशरथ भुवन परिसरात प्रचार सुरु असताना एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांची पाकीटे घरपोहोच करण्यात आल्याचा नागरिकांनी आरोप शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ठाकरे’ आजही मोठा ब्रँड? मुंबईतील लोकांना काय वाटतं? C Voter च्या सर्व्हेमध्ये नेमकं काय?

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपने पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा

प्रभात क्रमांक. 29 मध्ये भाजप आणि शिवसेना वेगवेगळ्या निवडणूक लढवत आहेत. याच प्रभाग क्रमांकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा करण्यात आला. या घटनेती माहिती निवडणूक आयोगाच्या पथकाने स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत पैसे करणाऱ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात असलेल्या आरोपींमध्ये दोन पुरुष आणि काही महिलांचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी एकच गोंधळ

दरम्यान, पोलिसांकडून कारवाई सुरु असताना घटनास्थळी एकच गोंधळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे. नागरिकांसह काही शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे. यावर भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी आरोप फेटाळून लावले. “आमचे कार्यकर्ते केवळ पत्रके व पॅम्प्लेट वाटण्यासाठी गेले होते. त्यांच्या खिशात जबरदस्ती तीन हजार रुपयांची पाकीटे टाकून त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, असा गावा त्यांनी केला.

हे ही वाचा : आईनं आपल्या 10 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं, नंतर स्वत:ला संपवलं, घटनेनं कुटुंब हादरले

भाजपच्या वतीने पोलिसांना विनंती करण्यात आली की, हे आरोपी नसून त्यांना ताब्यात घेतलं जाऊ नये. मात्र, पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं असून चौकशी सुरु केली आहे. या घटनेनं डोंबिवलीतील निवडणुकीच्या प्रचारात तणाव निर्माण झाला असून या प्रकरणाचा गंभीर दखल घेण्यात येत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp