Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांचा Video व्हायरल, डान्स करणारा ‘तो’ कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Amruta Fadnavis Viral Video With Riyaz Aly: मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)कायमच चर्चेत असतात. कधी आपल्या गाण्यांमुळे तर कधी रोखठोख राजकीय वक्तव्यांमुळे. पण आता अमृता फडणवीस या चर्चेत येण्याचं कारण आहे एक ते टिकटॉक स्टार. ज्याने थेट अमृता फडणवीसांचं घर गाठलं आहे. एवढचं नाही तर अमृता फडणवीस यांच्यासोबत त्याने डान्स देखील केला आहे. आता हा टिकटॉक स्टार नेमका कोण आहे? याचं नाव काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (amruta fadnavis video viral Who is riaz dancing with amruta fadnavis)

ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांसोबत डान्स करणाऱ्या या स्टारचं नाव आहे रियाज अली. (Riyaz Aly) याचं खरं नाव रियाज आफ्रीन असं आहे. हा मॉडेलिंग, फॅशन ब्लॉगिंग आणि अभिनयही करतो. त्याचा जन्म भूतानच्या जैगावमध्ये झाला असून तो सध्या मुंबईमध्ये राहतो.

Mood Banaleya Song : अमृता फडणवीसांचं गाणं देवेंद्र फडणवीसांना कसं वाटलं?

हे वाचलं का?

रियाजने त्याच्या करिअरची सुरुवात टिकटॉक व्हिडीओपासून केली. टिकटॉकवर रियाजला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर त्याने वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईत येऊन करिअरची सुरुवात केली. त्याने टोनी कक्करसोबत काम केलं असून आतापर्यंत तो अनेक अल्बम साँग्समध्ये मुख्य भूमिकेतही दिसला आहे.

नुकतंच अमृता फडणवीसांचं ‘मैं मुड बनालिया है’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. त्यांच्या या गाण्याला यूट्यूबवर जवळजवळ 50 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. रियाज अलीने अमृता फडणवीस यांच्या याच गाण्यावर त्यांच्यासोबत रिल केला आहे. या सोबतच रियाजने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्याने अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीसांचे घरी बोलवल्याबद्दल आभारही मानले आहेत.

ADVERTISEMENT

अमृता फडणवीसांची ‘ही’ टॉप 5 गाणी तुम्ही ऐकली आहेत?

ADVERTISEMENT

अमृता फडणवीस आणि रियाजचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया देखील यायला सुरुवात झाली आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहे. तसेच काही ट्रोलर हे अमृता फडणवीस यांना नेहमीप्रमाणे ट्रोल देखील करत आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT