नवी मुंबईला हादरून टाकणारी घटना, दिवसाढवळ्या गोळ्या झाडून बिल्डरची हत्या
Navi Mumbai Crime: नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ येथे भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची (Builder) गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये सावजी पटेल नामक बांधकाम व्यावसायिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (an incident that […]
ADVERTISEMENT
Navi Mumbai Crime: नवी मुंबई: नवी मुंबईतील (Navi Mumbai) नेरूळ येथे भरदिवसा एका बांधकाम व्यावसायिकाची (Builder) गोळ्या झाडून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कारने जात असताना बांधकाम व्यावसायिकांवर भररस्त्यात गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामध्ये सावजी पटेल नामक बांधकाम व्यावसायिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सध्या नवी मुंबई पोलीस अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. (an incident that shook navi mumbai a builder was shot dead in broad daylight)
नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या वाहतानातून जात असताना एका दुचाकीवरुन आलेल्या दोघा मारेकऱ्यांनी आपल्या पिस्तूलमधून तीन गोळ्या झाडल्या. या गोळ्या सावजी पटेल यांच्या छातीत आणि पोटात घुसल्याने पटेल यांचा जागीच मृत्यू झाला .
पटेल यांची हत्या व्यावसायिक वादातून झाली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र, हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सावजी पटेल हे आपल्या कारने नेरूळ येथून जात असताना दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून या गोळ्या झाडल्या. गोळीबाराचा आवाजाने येथील स्थानिक नागरिकांमध्ये काही काळ घबराट पसरली. ज्यानंतर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याबाबत तात्काळ फोनवरून माहिती दिली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.
Chandrashekhar Patil: शिवराज पाटील चाकूरकरांच्या चुलत भावाची गोळ्या झाडून आत्महत्या
ADVERTISEMENT
यावेळी पोलिसांना सावजी पटेल यांचा मृतदेह गाडीत आढळून आला. पोलिसांना घटनास्थळी तीन रिकामी काडतुसं सापडले असून त्याआधारे पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत. या हत्येच्या निमित्ताने अनेक वर्षानंतर नवी मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. बांधकाम व्यावसायिकाची हत्या झाल्याने पोलीस देखील सतर्क झाले आहे. या हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे हे शोधून काढण्याचं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
ADVERTISEMENT
CM एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेनेच्या नेत्याची हत्या
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात त्यांच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली होती. ठाण्यात नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास व्यवसायाच्या वादातून डोक्यात चॉपर मारून हत्या केल्याची ही घटना घडली होती. या घटनेतील मयत हा शिवसेनेचा उपविभाग प्रमुख पदावर होता.
ठाण्यातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका, पेढा मारुती मंदिरासमोर 28 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास रवींद्र मच्छिन्द्र परदेशी (वय 49 वर्ष) यांच्यावर काही अज्ञात इसमांनी डोक्यात चॉपरच्या साहाय्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
मुलाशी वाद, बापाने 2 तासात झाडल्या 30 गोळ्या, तीन पोलीसही जखमी; काय आहे प्रकरण?
रवींद्र परदेशी हे शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख पदावर होते. त्यांना तात्काळ ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, डॉक्टरांनी रवींद्रला मृत घोषित केले. बारक्या उर्फ राजेंद्र परदेशी याचा लहान भाऊ रवींद्र परदेशी आहे. फेरीवाल्यांवर बारक्या याचे वर्चस्व होते. त्याच्या मृत्यूनंतर रवींद्र परदेशी हा देखील फेरीवाल्यांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेत होता. त्यातच नुकतीच त्याची शिवसेना (शिंदे गट) मध्ये उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. पण ही हत्या कुठल्याही राजकीय हेतूने झाली नसून व्यवसायाच्या वादातून झाल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. दरम्यान फेरीवाल्याच्या हप्ता वसुली आणि वर्चस्वाच्या स्पर्धेचा रवींद्र परदेशी हा बळी ठरला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे : भर चौकात पैलवानाची गोळ्या घालून हत्या;
थरारक घटना सीटीटीव्हीत कैद
ADVERTISEMENT