नाशिक हादरलं : आईला बेशुद्ध करून 3 महिन्याच्या चिमुकलीचा चिरला गळा
Nashik Crime News : नाशिक : शहरातील गंगापूर-सातपूर लिंक रोड परिसरातून धक्कादायक आणि ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका अज्ञात महिलेने घरात शिरून आईला बेशुद्ध करत 3 महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली आहे. धृवांशी भूषण रोकडे असं मृत चिमुकलीचं नाव आहे. या घटनेन शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा […]
ADVERTISEMENT
Nashik Crime News :
ADVERTISEMENT
नाशिक : शहरातील गंगापूर-सातपूर लिंक रोड परिसरातून धक्कादायक आणि ह्रदय पिळवटून टाकणारी घटना समोर येत आहे. एका अज्ञात महिलेने घरात शिरून आईला बेशुद्ध करत 3 महिन्याच्या चिमुकलीची हत्या केली आहे. धृवांशी भूषण रोकडे असं मृत चिमुकलीचं नाव आहे. या घटनेन शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. (An unknown woman has entered the house and killed the three-month-old baby)
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गंगापूर-सातपूर लिंक रोडवरील धृव नगर परिसरात भूषण रोकडे हे पत्नी, आई आणि 3 महिन्याच्या धृवांशी सोबत राहतात. भूषण हे सातपूरमधील एका कंपनीत सुपरवायझर आहेत. सोमवारी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले, त्यावेळी घरात त्यांच्या आई आणि पत्नी दोघीच होत्या. सायंकाळी भूषण रोकडे यांच्या आई दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी भूषण यांची पत्नी आणि चिमुकली धृवांशी घरात होत्या.
हे वाचलं का?
या दरम्यान, पंजाबी ड्रेस घातलेली अज्ञात महिला अचानक त्यांच्या घरात शिरली, या अज्ञात महिलेने धृवांशी आणि तिच्या आईच्या नाकाला रूमाल लावला. रुमालाला गुंगीचे औषध लावलं असल्यानं आई बेशुद्ध झाल्या. यानंतर या अज्ञात महिलेने घरातच पलंगावर झोपलेल्या तीन महिन्याच्या निष्पाप चिमुकलीचा धारधार शस्त्राने गळा चिरला असल्याची माहिती समोर येत आहे.
“संजय राऊत महागद्दार,26 मार्चपर्यंत माफी मागितली नाही, तर…”, दादा भुसेंचा विधानसभेत चढला पारा
ADVERTISEMENT
काही वेळानंतर भूषण यांच्या आई दूध घेऊन घरी आल्या. यावेळी त्यांना आपली सून बेशुद्ध अवस्थेत आणि दुसरीकडे आपल्या तीन महिन्यांची नात रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या बाबत नाशिकच्या गंगापूररोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. गुन्हा दाखल असून सध्यातरी तपास सुरू आहे, आता काही माहिती देणे योग्य नाही, असे पोलिसांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT