मुख्यमंत्र्यांच्या सभेला अंगणवाडी सेविकांना उपस्थितीची सक्ती? जिल्हाध्यक्षांचे स्पष्टीकरण

मुंबई तक

पैठण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभर दौरे सुरु आहेत. उद्या औरंगाबाद व पैठण येथे मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याचं एक पत्रक सोशियल मीडियावरती फिरत होते. मात्र हे पत्र फेक असल्याची माहिती शिंदे गटाच्या प्रवक्तांनी दिली आहे. पैठणमधील ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर रहा अशा आशयाचा पत्र फिरत होते परंतु ते आमच्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पैठण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभर दौरे सुरु आहेत. उद्या औरंगाबाद व पैठण येथे मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याचं एक पत्रक सोशियल मीडियावरती फिरत होते. मात्र हे पत्र फेक असल्याची माहिती शिंदे गटाच्या प्रवक्तांनी दिली आहे. पैठणमधील ४२ गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर रहा अशा आशयाचा पत्र फिरत होते परंतु ते आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाच्यावतीनं देण्यात आले आहे.

शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी काय दिलं स्पष्टीकरण?

शिंदे गटाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी व्हायरल होणाऱ्या पत्रकावर स्पष्टीकरण दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना अंगणवाडी सेविका, प्रकल्प अधिकारी आणि सर्व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या आहेत. मात्र हे पत्रक बनावट आहे. असं पत्र काढून व्हयरल करणे म्हणजे हा निव्वळ खोडसाळपणा आहे. हा आमच्या बदनामीचा प्रयत्न असल्याचं जंजाळ यांनी स्पष्ट केलं आहे.

पत्र समोर येताच अंबादास दानवेंचा संदिपान भुमरेंना टोला

त्या पत्राची प्रत आपल्या ट्विटवर टाकत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भुमरेंवरती टीका केली आहे. ”अमक्याचे लग्न अन तमकेच वऱ्हाडी!गतवेळी रिकाम्या खुर्च्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रसंग मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर ओढावला होता. आता तशी फजिती नको म्हणूनच की काय तालुक्यातील अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांच्या सभेला बोलावण्यात येत आहेत.

आता या बिचाऱ्या महिला चिखल तुडवत आपले काम सोडून पैठणला येतील. असे रिकामे उद्योग या भगिनींना सांगण्यापेक्षा त्यांचे मानधन वेळेत मिळेल याकडे जास्त लक्ष देण्याची गरज या सरकारला वाटत नाही. विशेष म्हणजे या सभेला येणाऱ्या इतरांसाठी विशेष ‘रोख पॅकेज’ची व्यवस्था करण्यात आली आहे.” असं ट्विट अंबादास दानवेंनी केलं आहे.

यापूर्वी संदिपान भुमरेंच्या कार्यक्रमाला रिकाम्या खुर्चा असल्यानं चर्चा

दरम्यान संदिपान भुमरे ज्यावेळी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पैठण मतदारसंघात कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी अफाट गर्दी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र उलट चित्र पाहायला मिळालं. कार्यक्रमाला मोजकेच जण उपास्थित होते, त्यामुळे अनेक खुर्च्या रिकाम्याच होत्या. विशेष म्हणजे सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरु होणार होता, तो संध्याकाळी चार वाजता सुरु झाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp