अनिल देशमुख, नवाब मलिकांची सुप्रीम कोर्टात धाव; मतदानाला परवानगी मिळणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर आता दोघांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या वकिलांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे, सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी २ नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. “सुट्टी दरम्यान कोणतेही प्रकरण कोर्टात घ्यायचे असल्यास सरन्यायाधिशांची परवानगी लागते. एक पत्र CJI यांना द्यावे लागते, त्यामुळे दुपारी 2:00 नंतर हे प्रकरण घेतले जाऊ शकते का नाही ते पाहूया असे स्पष्टीकरण न्यायालयाने दिले आहे.

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीत एक-एक मताला महत्त्व आहे, त्यामुळे नवाब मलिक, अनिल देशमुख प्रत्येक मार्ग अवलंबून पाहत आहेत. राज्यसभा निवडणुकीत ही दोन मतं महाविकास आघाडीला मिळाली असती तर सर्व त्यांचे उमेदवार निवडणून आले असते परंतु ती मिळू शकलेली नव्हती. आता या निवडणुकीत जर मतदान करण्याची परवानगी मिळाली तर महाविकास आघाडीला त्याचा फायदा होऊ शकतो.

दरम्यान विधान परिषदेच्या १० जागांसाठी राज्यात निवडणूक होत आहे. विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजपने ५ उमेदवार उतरवेल आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं प्रत्येकी दोन उमेदवार उतरवले आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे १०व्या जागेवर कोण बाजी मारणार यांची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

हे वाचलं का?

टिळक, जगताप बजावणार मतदानाचा अधिकार

दीर्घकाळापासून आजारी असलेले दोन आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप मतदान करणार आहेत. दोघांनाही गंभीर आजाराने ग्रासलं असून, ते मतदान करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, मुक्ता टिळक मतदानाला आल्या असून, लक्ष्मण जगतापही मतदान करणार आहेत. दोघांनी राज्यसभा निवडणुकीवेळीही मतदानाचा अधिकार बजावला होता.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT