Money laundering case : आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नाव नाही!; ED ने सांगितलं कारण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने तब्बल 14 विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे. मात्र, अनिल देशमुख यांच्याच नावाचा यात समावेश नाही. यासंबंधी ईडीने खुलासा केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केलेला आहे. याच प्रकरणात अमंलबजावणी […]
ADVERTISEMENT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने तब्बल 14 विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे. मात्र, अनिल देशमुख यांच्याच नावाचा यात समावेश नाही. यासंबंधी ईडीने खुलासा केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केलेला आहे. याच प्रकरणात अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडी भ्रष्टाचाराचा तपास करत आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केलं असून त्यात देशमुखांच्या नाव नाही.
आरोपपत्रात देशमुख यांच्या नावाचं समावेश नसण्यामागचं कारणही ईडीने स्पष्ट केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरण अनिल देशमुखांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या या संपूर्ण प्रकरणात त्याचा नेमका काय सहभाग होता, हे अद्याप निश्चित झालेलं नाही, त्यामुळे तपास सुरु राहणार असल्याचं ईडीने म्हटलं आहे.
money laundering case : अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित










