अनिल देशमुख-नवाब मलिकांना फ्लोअर टेस्टला उपस्थित राहण्यास परवानगी
मुंबई: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोघांनाही उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही अर्जदार सीबीआय आणि ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही एजन्सींना त्यांना कार्यवाही होईपर्यंत विधानसभेच्या सभागृहात हजर करण्याचे आणि नंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत आणण्याचे निर्देश […]
ADVERTISEMENT
मुंबई: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोघांनाही उद्या सकाळी ११ वाजता सभागृहाच्या कामकाजात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. दोन्ही अर्जदार सीबीआय आणि ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन्ही एजन्सींना त्यांना कार्यवाही होईपर्यंत विधानसभेच्या सभागृहात हजर करण्याचे आणि नंतर पुन्हा न्यायालयीन कोठडीत आणण्याचे निर्देश दिले आहेत.
ADVERTISEMENT
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभा निवडणूक आणि विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला परवानगी दिली गेली नव्हती. परंतु आज सुप्रीम कोर्टाने दोघांना उद्या होणाऱ्या फ्लोअर टेस्टला परवानगी दिली आहे. शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी यासंदर्भात टिका केली आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय महत्त्वाचा आहे त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. विश्वासदर्शक ठरावावार स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिल्यानंतर शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
हे वाचलं का?
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर सरकार अस्थिर झाले. हे सगळे आमदार आधी गुजरात आणि त्यानंतर आसामच्या गुवाहाटीत होते. आज गुवाहाटीतून हे सगळे आमदार सुरतला पोहचले त्यानंतर गोव्याला गेले.
विश्वासदर्शक ठरावाची मागणी भाजपकडून मंगळवारी झाली त्यानंतर हे सगळं प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं. सुप्रीम कोर्टात शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळत उद्याच फ्लोअर टेस्ट घ्या असं सांगितलं आहे. यासंदर्भात साडेतीन तास सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT