पुणेकरांना महागाईत आणखी एक झटका! रिक्षाच्या भाड्यात वाढ
पुणेकरांना आता रिक्षाचा प्रवास देखील महागणार आहे. रिक्षा चालक संघटना आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हादरवाढीचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पहिल्या दिढ किमीला 2 रुपये तर नंतरच्या किमीमागे 1 रुपयाने वाढकरण्यात आली आहे. नवीन वाढीव दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीत हे नवीनदर लागू होणार आहेत. पुण्याच्या रिक्षाच्या भाड्यात वाढ पुणेकरांच्या […]
ADVERTISEMENT

पुणेकरांना आता रिक्षाचा प्रवास देखील महागणार आहे. रिक्षा चालक संघटना आणि प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हादरवाढीचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. पहिल्या दिढ किमीला 2 रुपये तर नंतरच्या किमीमागे 1 रुपयाने वाढकरण्यात आली आहे. नवीन वाढीव दर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि बारामतीत हे नवीनदर लागू होणार आहेत.
पुण्याच्या रिक्षाच्या भाड्यात वाढ
पुणेकरांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य त्रस्त आहे. इंधनाचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. शिंदे सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात जरी काही अंशी कपात केली असली तरीसीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. पुण्यातील बहुतांश रिक्षे सीएनजीवर चालतात. त्यामुळे वाढती महागाई आणि त्यात सीएनजीच्या दरातली वाढ यामुळे रिक्षा चालकांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रिक्षा संघटनेकडून दरात वाढकरावी, अशी मागणी वारंवार करत होत होती.
या मागणीची दखल घेत प्रादेशिक परिवहन आणि रिक्षा संघटनाची सोमवारी बैठक करून घेतील त्याचऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे. त्यामुळे आता इतर दरवाढीसह पुणेकरांना रिक्षा भाडे दरवाढीचादेखील सामना करावा लागणार आहे. पार पडली. या बैठकीत नवीन वाढीव दराचा निर्णय घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील तीन आसनी ऑटोरिक्षांसाठी येत्या १ ऑगस्टपासून ही दरवाढ केली जाणार आहे. जवळपास ही दरवाढ २रुपयांनी झाली आहे. पहिल्या दीड किमी अंतरासाठी सद्याच्या २१ रूपये भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर २३रूपये करण्यात आला आहे. तसेच त्यापुढील प्रत्येक कि. मी. साठी देय भाडे १४ रूपयांवरून १५ रूपये करण्यात आलेआहे, अशी माहिती माहिती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजितशिंदे यांनी दिली.
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी २५ टक्के अतिरिक्तभाडेदर असेल. महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागांकरिता रात्री १२ ते सकाळी ५ या कालावधीसाठी ४०टक्के अतिरिक्त भाडेदर राहणार आहे. प्रवाशांसमवेतच्या सामानासाठी 60×40 सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षामोठ्या नगासाठी ३ रूपये अतिरिक्त शुल्क असणार आहे. ऑटोरिक्षाचे मीटर पुन:प्रमाणीकरणासाठी (मीटरकॅलीब्रेशन) १ ऑगस्टपासून ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे ऑटोरिक्षा चालक १ ऑगस्टपासून मीटरपुनः प्रमाणीकरण करून घेतील त्याच ऑटोरिक्षाधारकांसाठी भाडे सुधारणा लागू राहणार आहे. त्यामुळे आता इतरदरवाढीसह पुणेकरांना रिक्षा भाडे दरवाढीचा देखील सामना करावा लागणार आहे.