Parambir Singh यांच्या अडचणीत वाढ, आणखी एक गुन्हा दाखल

दिव्येश सिंह

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणी, फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासोबत त्यांचे सहकारी संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीयेत. मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्यात सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक खंडणी, फसवणूक आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परमबीर सिंग यांच्यासोबत त्यांचे सहकारी संजय पुनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि DCP पराग मणेरे यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

परमबीस सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना पराग मणेरे हे ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत होते. यानंतर परमबीर सिंग यांनी मुंबईत बदली झाल्यानंतर पराग मणेरे यांनाही मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेत बढती देण्यात आली होती. पुनामिया आणि जैन यांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी याआधीच अटक केली आहे.

शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात परमबीर सिंग आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. शरद अग्रवाल हा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेले बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांचा पुतण्या आहे. शरद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अग्रवाल यांच्याकडून २ कोटी रुपये वसूल करत एका जमिनीच्या कागदपत्रांवर जबरदस्तीने सही करायला लावली. परमबीर सिंग ठाणे पोलीस आयुक्त म्हणून काम करत असताना त्यांच्या बंगल्यावर हा प्रकार घडल्याचं शरद अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय.

सध्या कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ निरीक्षक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp