आणखी एका नवरा-बायकोचा बाथरूममध्ये एकत्रच मृत्यू, का घडतंय असं?
Husband Wife Died in Bathroom: भिलवाडा: होळी खेळून एकत्र आंघोळीसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा (Bhilwara) जिल्ह्यातील शाहपुरा येथे घडली आहे. शीतला अष्टमीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर बाथरूममध्ये एकत्र आंघोळीला गेलेल्या एका पती-पत्नीचा गॅस गिझरमधून (Gas Geyser) बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे (poisonous […]
ADVERTISEMENT

Husband Wife Died in Bathroom: भिलवाडा: होळी खेळून एकत्र आंघोळीसाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा मृत्यू (Death) झाल्याची घटना गाझियाबादमध्ये घडली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा तशीच घटना राजस्थानमधील (Rajasthan) भिलवाडा (Bhilwara) जिल्ह्यातील शाहपुरा येथे घडली आहे. शीतला अष्टमीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर बाथरूममध्ये एकत्र आंघोळीला गेलेल्या एका पती-पत्नीचा गॅस गिझरमधून (Gas Geyser) बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे (poisonous gas) गुदमरून एका जोडप्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे याच विषारी वायूमुळे जोडप्याचा लहान मुलगाही बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला भिलवाडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (another husband wife death together in the bathroom why is this happening)
एजन्सी मोहल्ला येथे राहणारे शिवनारायण झंवर (वय 37 वर्ष) आणि त्यांची पत्नी कविता झंवर (वय 35 वर्ष) हे चार वर्षांच्या निरागस चिमुकल्या विहानसोबत रंग खेळल्यानंतर बाथरूममध्ये अंघोळीसाठी गेले होते.
जवजवळ एक तास उलटून गेला तरीही तिघे बाहेर न आल्याने नातेवाईकांनी त्यांना आवाज दिला. पण बाथरूममधून काहीही आवाज न आल्याने नातेवाईकांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. त्यावेळी पती-पत्नी आणि मुलगा हे बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत पडले होते आणि गॅस गिझर चालू होता. यावेळी नातेवाईकांनी घाईघाईत तिघांनाही तात्काळ रुग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी दाम्पत्याला मृत घोषित केलं.
अपघातातील बालक विहानची प्रकृती गंभीर असल्याने त्याला भिलवाडा येथील रुग्णालयात पाठविण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी राजकुमार नायक पोलीस पथकासह रुग्णालयात पोहोचले. या घटनेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘बाथरूममधील गिझरमधून विषारी वायू बाहेर पडल्याने या जोडप्याचा गुदमरून मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती समोर येईल.’










