video : विघ्नहर्ता तू, मेरा विघ्नहर्ता रे… ‘अंतिम’ पहिलं गाणं रिलीज
सलमान खान, आयुष शर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभालाच विघ्नहर्ता गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सलमान खान, आयुष शर्मा व वरूण धवन हे या गाण्यात आहेत. गणरायाची प्रतिष्ठापना करण्याच्या मुहूर्तावर विघ्नहर्ता गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचा सेटही भव्य दिसत असून, […]
ADVERTISEMENT
सलमान खान, आयुष शर्मा यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभालाच विघ्नहर्ता गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सलमान खान, आयुष शर्मा व वरूण धवन हे या गाण्यात आहेत.
ADVERTISEMENT
गणरायाची प्रतिष्ठापना करण्याच्या मुहूर्तावर विघ्नहर्ता गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्याचा सेटही भव्य दिसत असून, सुरूवातील अभिनेता वरूण धवन व आयुष शर्मा नृत्य करतात. त्यानंतर सलमान खानची एंट्री दाखवलेली आहे.
गाण्याचं संगीत जबरदस्त असून, प्रेक्षक व गणेशभक्तांची पसंती मिळताना दिसत आहे. गाण्यात सिनेमातील काही दृश्येही आहेत. ज्यात सिनेमातील क्लायमॅक्समध्ये सलमान आणि आयुष शर्मा दोघेही एकमेकांशी भिडताना दिसत आहेत.
हे वाचलं का?
या गाण्याच्या शुटिंगवेळी आयुष शर्माच्या खांद्याला जखम झाली होती. मार लागूनही आयुषने या गाण्याचं शुटिंग पूर्ण केलं होतं. ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं असून, सलमान खान निर्माता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT