Video : आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी गायलं गाणं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अनेक दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी वयाच्या ८८व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा एकदा आवाज दिला आहे. महेश टिळेकर दिग्दर्शित आगामी “हवाहवाई” या चित्रपटातील उडत्या चालीचं गाणं आशा भोसले यांनी गायलं असून, या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षानंतर त्यांनी मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले आहे.

ADVERTISEMENT

“हवाहवाई” या चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाईंटी नाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

हे वाचलं का?

महेश टिळेकर यांनीच लिहिलेल्या “जगण्याची ही मजा घेऊया नव्याने, जाऊया पुढे पुढे साऱ्यांच्या साथीने दिशा नव्या वाटे हव्या, साद देती आता उडण्याची…’ असं शब्दरचना असलेलं गाणं आशा भोसले यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं.

भारतीय चित्रपट क्षेत्रात जवळपास प्रत्येक भाषेतील चित्रपटासाठी आशा भोसले यांनी गाणी गायली आहेत. “हवाहवाई” चित्रपटातील त्यांचे हे गाणे ऐकून त्या ८८ वर्षाच्या आहेत, यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही; इतक्या अप्रतिम पद्धतीनं आशा भोसले यांनी हे गाणं गायलं आहे.

ADVERTISEMENT

बऱ्याच वर्षांनंतर आशा भोसले यांनी मराठी चित्रपटासाठी गाणं गायलं असून, या गाण्याविषयी आणि महेश टिळेकर दिग्दर्शित “हवाहवाई” चित्रपटाविषयीही सिनेरसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मल्टि स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात काही चेहरेही दिसणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT