शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या अस्थींचं चंद्रभागेत विसर्जन
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचं आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आलं होतं. १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज झालेल्या अस्थिविसर्जनादरम्यान उपस्थित लोकांनी बाबासाहेब पुरंदरे अमर रहे अशा घोषणा दिल्या. पुरंदरे यांच्या अस्थिंचा कलश श्री. विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वार येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात […]
ADVERTISEMENT

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थींचं आज पंढरपुरातील चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आलं होतं. १५ नोव्हेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज झालेल्या अस्थिविसर्जनादरम्यान उपस्थित लोकांनी बाबासाहेब पुरंदरे अमर रहे अशा घोषणा दिल्या.
पुरंदरे यांच्या अस्थिंचा कलश श्री. विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वार येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात दिंडीसह अस्थिकलश संत नामदेव पायरीजवळ आणि नंतर चंद्रभागेच्या तिरावर आणण्यात आला. तिथे अस्थींचे विधीवत पूजन करण्यात आले. तिथे ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी शिवशाहीर पुरंदरे यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी शिवभक्त आणि कै. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी आदर असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, उपनगराध्यक्षा श्वेता डोंबे, ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूरकर, शिवभक्त प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल शंकर बडवे, मुकुंदराव परिचारक, माजी उपनगराध्यक्ष व पक्षनेते अनिल अभंगराव, ऍड. संग्राम अभ्यंकर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अस्थिकलशांचे दर्शन घेऊन बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन केले.