भारनियमनाविरोधात भाजपचं शनिवारपासून सात दिवस राज्यभर आंदोलन, आशिष शेलारांची घोषणा

मुंबई तक

गुरूवारपर्यंत राज्यात विजेची अघोषित आणीबाणी होती मात्र गुरूवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत कबुली दिली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करत असून आधी विजेची टंचाई निर्माण करायची आणि चढ्या दराने वीज घेत आणि कंपनीकडून टक्केवारी घ्यायची असा प्रकार सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

गुरूवारपर्यंत राज्यात विजेची अघोषित आणीबाणी होती मात्र गुरूवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत कबुली दिली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करत असून आधी विजेची टंचाई निर्माण करायची आणि चढ्या दराने वीज घेत आणि कंपनीकडून टक्केवारी घ्यायची असा प्रकार सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आली असून वीज नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपनीचं काम बेशिस्त करण्याचं काम हे या सरकारने केलं आहे. जाणून बुजून सरकार कडून भारनियन निर्माण केलं जातं आहे. आणि याच विरोधात भाजपा उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.

भारनियमनाविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन

सरकारने जे भारनियमन सुरू केलं आहे त्याविरोधात भारतीय जनता पक्ष उद्यापासून सात दिवस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.राज्यभर भाजप कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

हे वाचलं का?