गोट्याभाऊंनी आपल्याच सरकारचा आदेश धुडकावला!
जुन्नर: राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडताना दिसतो आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व बेल्हे गावचा उपसरपंच गोट्याभाऊ वाघ यांच्या लग्नात रात्री उशिरापर्यंत डीजे, लाईट सिस्टीम सुरू ठेवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. लग्नाला 200 लोकांची मर्यादा असतानाही 1 हजारांच्यावर लोक उपस्थित होते तर वरातीतसुद्धा तीच […]
ADVERTISEMENT

जुन्नर: राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडताना दिसतो आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता व बेल्हे गावचा उपसरपंच गोट्याभाऊ वाघ यांच्या लग्नात रात्री उशिरापर्यंत डीजे, लाईट सिस्टीम सुरू ठेवल्याचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. लग्नाला 200 लोकांची मर्यादा असतानाही 1 हजारांच्यावर लोक उपस्थित होते तर वरातीतसुद्धा तीच अवस्था होती.
या लग्नात ना सोशल डिस्टंस्न्टिंगचं पालन केलं गेलं, ना मास्क वापरले गेले. शिवाय या सगळ्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरही दादागिरी केली गेली. अखेर रात्री उशिरा आयोजकांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
काल (27 फेब्रुवारी) दिवसभर या लग्न सोहळ्याला जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, पारनेरचे आमदार निलेश लंके हे उपस्थित होते. सत्ताधारी आमदारांनी जर कार्यकर्त्यांना लगाम घातला नाही तर दाद कुणाकडे मागायची? असा सवाल उपस्थिती केला जात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना काळात अशा गर्दीवर आवर घालण्याची विनंती केली असताना कार्यकर्ते मात्र बेफाम वागताना दिसत आहे. जे अतिशय चिंताजनक आहे.
ही देखील बातमी पाहा: मुलाचा लग्न सोहळा रद्द करणाऱ्या मंत्र्याचं CM ठाकरेंकडून कौतुक