मनसुख हिरेन प्रकरण : एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता मुंब्रा खाडी येथे सापडला होता. या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते. विरोधकांनी टाकलेल्या दबावानंतर महाराष्ट्र सरकारने प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला. मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जवाबानुसार, एटीएसने अज्ञात व्यक्तीविरोधात हत्या, पुरावे नष्ट करणे असे गुन्हे दाखल केले आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज सभागृहाच्या कामकाजात याची माहिती दिली.

ADVERTISEMENT

हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतू मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंचा यामधील सहभागावर विरोधीपक्षाने प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यानंतर याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत याप्रकरणात सर्व कागदपत्र आणि पुरावे हाती घेतले आहेत. हिरेन यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी दिला ज्यात त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा नसल्याचं नमूद केल होतं. परंतू हिरेन यांच्या मृत्यूचं नेमकं कारण हे Viscera Report आणि Chemical Analysis चा रिपोर्ट आल्यानंतर समजेल अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली होती.

दरम्यान या प्रकरणाचा तपास करताना एटीएसला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. मनसुख घरातून बाहेर पडल्यानंतर कुठेकुठे गेले…त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज एटीएसचे अधिकारी तपासणार आहेत. मनसुख हिरेन हे गुरुवारी रात्री साडे आठ वाजता घोडबंदर रोडवर पोलीस अधिकारी तावडे यांचा फोन आल्यामुळ गेले होते. याप्रकरणाचं सीसीटीव्ह फुटेज पोलीसांना मिळालं आहे. मात्र यानंतर हिरेन यांच्यासोबत पुढे काय झालं हे अजुनही गुलदस्त्यात आहे. मनसुख यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन वसई-विरार येथील मांडवी येथे असल्याचं दाखवत आहे. त्यामुळे हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत कसा आला याचाही एटीएस अधिकाऱ्यांना तपास करावा लागणार आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एटीएसने १० पथकं स्थापन केली आहेत. हिरेन यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ज्या मांडवी भागात आढळलं होतं तिकडे एटीएसचं एक पथक तपासासाठी दाखल झालं आहे. याव्यतिरीक्त एटीएसचं एक पथक मुंब्रा खाडीच्या परिसरात तपास करत आहे. याव्यतिरीक्त एटीएसचं एक पथक याप्रकरणी सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासत असून एक पथक मनसुख यांचे सर्व कॉल डिटेल्स तपासत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालात एटीएस या प्रकरणाची कशी चौकशी करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी या प्रकरणात एटीएसचे अधिकारी सत्य शोधून काढत या प्रकरणाच्या मुळापर्यंत जातील असा विश्वास व्यक्त केला आहे. याचसोबत भाजपला बेजबाबदार पक्ष म्हणत प्रकरणातील कॉल डिटेल्स रेकॉर्ड भाजपकडे कसे आले असा सवालही सावंत यांनी केला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातही आज हिरेन प्रकरणात विरोधकांच्या भूमिकेवर टीका करुन….मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकार विरोधकांनी थांबवावे असं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

हिरेन मृत्यू प्रकरण : मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याची सवय सोडा !

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT