बायको पाहिजे, पण निवडणूक लढवण्यासाठी; औरंगाबादमध्ये झळकले बॅनर; राज्यभर चर्चा
–इसरार चिश्ती, औरंगाबाद राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेसाठीही निवडणूक होणार असून, अशातच शहरात झळकलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी चौकाचौकात बॅनरबाजी केली आहे. औरंगाबाद शहरातील रमेश विनायकराव पाटील हे जमीन खरेदी विक्रीचं […]
ADVERTISEMENT

–इसरार चिश्ती, औरंगाबाद
राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. औरंगाबाद महापालिकेसाठीही निवडणूक होणार असून, अशातच शहरात झळकलेल्या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. एका व्यक्तीने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे अशी चौकाचौकात बॅनरबाजी केली आहे.
औरंगाबाद शहरातील रमेश विनायकराव पाटील हे जमीन खरेदी विक्रीचं काम करतात. त्यांचं काही वर्षापूर्वी लग्न झालं होतं. त्यांना तीन मुलंही आहेत. हाच त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या मार्गात अडथळा ठरला आहे. त्यावर रमेश पाटील यांनी शक्कल लढवली आणि एका रात्रीत शहरभर उमेदवार बायको पाहिजे म्हणून बॅनर लावले.
औरंगाबाद शहरातील काही चौकांमध्ये हे बॅनर लावण्यात आले असून, त्यावर औरंगाबाद महानगर पालिका निवडणूक 2022. मला तीन मुलं असल्याने मी निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे. (जातीची अट नाही) वय 25 ते 40. अविवाहित/विधवा/घटस्फोटीत चालेल. फक्त 2 पेक्षा जास्त अपत्य असणारी चालणार नाही, असं पाटील यांनी म्हटलं आहे. हे बॅनर लावल्यानंतर पाटील यांना फोनही येऊ लागले आहेत.










