शिवशाहिराला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी; बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आज (15 नोव्हेंबर) पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. स्मशानभूमीत जमलेल्या अलोट गर्दीने लाडक्या शिवशाहिराला साश्रुनयनांनी निरोप दिला.

ADVERTISEMENT

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं सोमवारी पहाटे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. मागील तीन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

बाबासाहेब पुरंदरे: ‘जाणता राजा’ कसं घडलं?, जाणून घ्या त्यामागची इंटरेस्टिंग कथा

हे वाचलं का?

14 नोव्हेंबरला सायंकाळी बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आली होती. उपचार सुरू होते, पण सोमवार शिवशाहिरांच्या निधनाचं वृत्त घेऊनच उजाडला. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचं वृत्त वाऱ्यासारखं पसरलं. त्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली.

सकाळी 8:30 वाजता पर्वती येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेण्यात आलं. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिव आणण्यात आलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्या होत्या. त्यानुसार मानवंदना देऊन बाबासाहेबांना अलोट गर्दीच्या साक्षीने अखेरचा निरोप देण्यात आला.

ADVERTISEMENT

शिवशाहीर पुरंदरेंनी शिवछत्रपतींचा इतिहास जनतेसमोर ठेवला, पण…: शरद पवार

ADVERTISEMENT

बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी…

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहिण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा’,‘केसरी’ यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण ‘राजा शिवछत्रपती’ या कांदबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.

“सावरकर मला म्हणाले, ‘फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस”; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा

याच कादंबरीवर आधारित पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’हे नाटकही लिहलं. जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एका भव्यदिव्य नाटकांची निर्मिती केली होती. ज्याच हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला होता. दरम्यान, फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते. अनेकदा ते संघाच्या जाहीर कार्यक्रमात देखील सहभागी व्हायचे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT