बच्चू कडूंनी गुवाहटीमध्ये करोडोंचे व्यवहार केले; भाजप समर्थक आमदार रवी राणांचा आरोप
अमरावती : शिंदे गटातील आमदारांवर बंडखोरीसाठी भाजपकडून ५० कोटी रुपये घेतल्याचे आरोप सातत्याने महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांकडून झाले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच भाजप समर्थक बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन करोडो रुपयांचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर अमरावतीमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. […]
ADVERTISEMENT
अमरावती : शिंदे गटातील आमदारांवर बंडखोरीसाठी भाजपकडून ५० कोटी रुपये घेतल्याचे आरोप सातत्याने महाविकास आघाडीतील आमदार आणि नेत्यांकडून झाले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच भाजप समर्थक बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी शिंदे गटातील आमदार बच्चू कडू यांनी गुवाहटीला जाऊन करोडो रुपयांचा व्यवहार केला असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपांनंतर अमरावतीमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.
ADVERTISEMENT
बच्चू कडू – रवी राणा यांच्यातीला वादाचं कारण काय?
रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या दरम्यान मागील काही काळापासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. मंगळवारी अमरावतीमध्ये बोलताना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांचं नाव न घेता आरोप केले होते. जेव्हा मी निवडणूकचा अर्ज भरला तेव्हा आम्ही रक्तदान करून अर्ज भरतो. पण आधी खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटणारे काही कमी नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
तसंच जे इथं भाषण करतात सभागृहात काहीच करत नाहीत. ५० वर्षात अनेक आमदार गेले सभागृहात, पण किती जणांनी अपंग अनाथांसाठी आवाज उठवला? असा सवाल कडू यांनी केला होता. ताकाला जाऊन भांडं लपवायच हे आमचं काम नाही. कोणी कोणता झेंडा घेतला याचा संबंध नाही, आमचा झेंडा, अजेंडा हा सेवेचा झेंडा आहे, असे त्यांनी सांगितले होते.
हे वाचलं का?
या आरोपांवर बोलताना आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीला धोका दिला, गुवाहाटीमध्ये जाऊन त्यांनी करोडो रुपयांचा व्यवहार केला, असा खळबळजनक आरोप केला आहे. तसंच तुम्ही सुद्धा एक किलो साखर वाटून गरिबांची दिवाळी साजरी करा, असा सल्लाही दिला. मी गरिबी भोगली आहे, गोरगरिबाची दिवाळी साजरी करण्यासाठी मी किराणा वाटतो असं प्रत्युत्तरही त्यांनी दिलं. मात्र आपल्याच सहकारी गटाच्या समर्थक आमदारावर अशा प्रकारे आरोप सध्या चर्चेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT