BJPचा निरोप बाळासाहेबांनी का धुडकावलेला?, राज ठाकरेंनी सांगितला भन्नाट किस्सा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Raj Thackeray told an amazing story about Balasaheb Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र आज (23 जानेवारी) राज्याच्या विधानसभेतील (Vidhan Sabha) सेंट्रल हॉलमध्ये बसविण्यात आलं. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेबांचे पुतणे आणि मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी नेहमी प्रमाणेच जोरदार फटकेबाजी केली. पण याच भाषणात राज ठाकरेंनी बाळासाहेबांबाबतचा एक भन्नाट किस्साही सांगितला. (balasaheb kicked power for marathi raj thackeray told an amazing story)

ADVERTISEMENT

1999 साली शिवसेना-भाजपची सत्ता गेली तरीही बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करण्याची संधी ही शिवसेना-भाजपकडे होती. मात्र, त्यावेळी फक्त मराठी मुख्यमंत्री होणार नसल्याचं समजताच बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली असा किस्सा राज ठाकरेंनी विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषण करताना सांगितला.

राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांचा ‘तो’ किस्सा…

‘आज इथे उपस्थित असलेले अनेक जणं आणि उपस्थित नसलेले अनेक जणं ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली. त्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. बाळासाहेबांबद्दल बोलायचं तर.. मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालतानाचा सहवास, व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे. त्यामुळे सुरुवात कुठून करायची असा प्रश्न आहे.’

हे वाचलं का?

‘मी म्हटलं ना.. वारसा हा वास्तूंचा नसतो तो विचारांचा असतो. मी जर का काही जपलं असेल तर तो विचारांचा आहे. माझा जन्म एका कडवट मराठी घरामध्ये झाला आहे आणि एका हिंदुत्ववादी घरामध्ये झाला आहे. हे कडवट मराठीपण मला लहानपणापासून पाहायला मिळालं. बाळासाहेबांच्या बोलण्यातून ऐकायला मिळालं. त्याबाबतीत हा माणूस बाहेर वेगळा, आतमध्ये वेगळा कधीच नव्हता. याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन.’

Rane: ‘बाळासाहेबांना मानसिक त्रास..’, ‘त्या’ कार्यक्रमातही राणे ठाकरेंवर बरसले

ADVERTISEMENT

‘ही गोष्ट आहे 1999 सालची. जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते. तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. काही कारणास्तव शिवसेना-भाजपची युती ही मुख्यमंत्री पदावर अडत होती. ते काही घडत नव्हतं. जवळपास 15-20 दिवस आमदार खेचणं सुरू होतं. काय-काय चालू होतं. एके दिवशी दुपारची गोष्ट.. ‘मातोश्री’मध्ये मी बसलो होतो. तिथे गाड्यांचे आवाज ऐकू आले. दुपारी 3-3.30 वाजले असतील. दोन गाड्या लागल्या. त्यातून पुण्याचे प्रकाश जावडेकर आणि भाजप-शिवसेनेचे दोन-चार लोकं आली. मला म्हणाले राज साहेब जरा बाळासाहेबांना भेटायचं आहे.’

ADVERTISEMENT

‘मी म्हटलं ते झोपले आहेत.. विचार करा हा.. मी काय म्हणतोय ते. इथे सगळं बाहेर सुरू आहे. सरकार बनवणं.. म्हटलं त्यांची झोपायची वेळ आहे. ते त्यावेळी झोपणार. उठल्यावर ते बोलतील. अतिशय अर्जंट आहे. आज आपलं सरकार बसतंय. त्यामुळे बाळासाहेबांना भेटणं अर्जंट आहे. मी म्हटलं ते आता येणार नाहीत, भेटणार नाही.’

‘ते म्हणाले मग एक निरोप तरी द्याला का त्यांना.. आम्ही खाली थांबतो. मी म्हटलं निरोप देतो मी. त्यांनी मला सांगितलं की, आता आमचं दोघांचंही ठरलं आहे की, सुरेशदादा जैन हे आपल्या युतीचे मुख्यमंत्री असतील आणि सगळ्यांचं ठरलेलं आहे की, ते आमदार खेचून आणि आपलं सरकार बसतंय. तर हे फक्त बाळासाहेबांच्या कानावर घालायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे.’

‘मी वर गेलो.. आम्ही अरे-तुरेमध्ये बोलायचे. त्यामुळे मी त्यांना उठवलं. म्हटलं ए काका उठ.. काका उठ.. ते पालथे झोपले होते. जरा मोठ्याने आवाज काढला. ए काका उठ.. ते असे वळले.. म्हणाले, काय रे..’

‘MVA’ला चौथं चाक प्रकाश आंबेडकरांचं; अजून २ स्टेपन्या तयार : संजय राऊत

‘म्हटलं खाली ते जावडेकर आणि ती मंडळी वैगरे आली आहेत. ते म्हणतायेत आजच्या आज सरकार बसेल.. बाळासाहेब म्हणाले कसं?..’

‘ते म्हणतायेत की, सुरेशदादा जैन यांना मुख्यमंत्री करायचं बाकीचे सगळे आमदार ते आणतील आजच्या आज संध्याकाळपर्यंत आपलं सरकार बसेल. माझ्याकडे त्यांनी असं बघितलं. त्यांना जाऊन सांग.. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल, दुसरं कोणी बसणार नाही. वळले आणि झोपून गेले.’

‘महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल.. दुसरा कोणी बसणार नाही. मला त्याच क्षणी कळलं या माणसाने मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली. जिकडे मराठीची गोष्ट असते तिकडे मराठीसाठी कडवटपणा. जिकडे हिंदुत्वाची गोष्ट असते तिकडे हिदुंत्वासाठी कडवटपणा.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतचे हा भन्नाट किस्सा सांगितला. आपल्या या भाषणात राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणीही जागवल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT