महाराष्ट्रात मिरवणुका, आंदोलन, सभांना बंदी, मुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) राज्यातील जनतेशी संवाद साधताना काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा देखील केली. पुढील काही दिवस राज्यात मिरवणुका, आंदोलनं, मोर्चे आणि राजकीय सभांना बंदी घातली आहे. तसेच शक्य तेवढे शासकीय कार्यक्रम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे घेण्याचे आदेश देखील दिले आहेत. दुसरीकडे राज्यात कोरोनाचे […]
ADVERTISEMENT
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (21 फेब्रुवारी) राज्यातील जनतेशी संवाद साधताना काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा देखील केली. पुढील काही दिवस राज्यात मिरवणुका, आंदोलनं, मोर्चे आणि राजकीय सभांना बंदी घातली आहे. तसेच शक्य तेवढे शासकीय कार्यक्रम हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे घेण्याचे आदेश देखील दिले आहेत. दुसरीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण किती प्रमाणात वाढत हे पाहून लॉकडाऊनबाबत 8 ते 10 दिवसानंतर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
पुढील काही दिवस कोणकोणत्या कार्यक्रमांवर असणार बंदी?, मुख्यमंत्री काय म्हणाले!
‘उद्या माझा रायगड जिल्ह्यात एक कार्यक्रम आहे. पण तिथे देखील मी सूचना दिल्या आहेत. तिथे कमीत कमी माणसं हवीत. कृपा करुन आता गर्दी करु नका. उद्याच्या कार्यक्रमानंतर सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की, आता आपल्यापासून आपण सुरुवात करुयात. एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी सर्वांना झूमच्या पद्धतीने सुरु करण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं म्हटल्यानंतर तशी आंदोलनं नाही पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या काही यात्रा यांना आपण पुन्हा एकदा काही दिवसांसाठी बंदी करत आहोत. कृपा करुन सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं. मला माहिती आहे की, आपणा सर्वांना पक्ष वाढवायचा आहे. मला सुद्धा वाढवायचा आहे. माझ्या मित्र पक्षांना वाढवायचा आहे, विरोधकांना देखील वाढवायचा आहे. पण आपण पक्ष वाढवूया, कोरोना नको वाढवूया. या युद्धात आपण सगळे एकत्र राहिलो पाहिजे. जर आपण एकत्र राहिलो नाही तर मात्र पुन्हा एकदा आपल्याला लॉकडाऊन कडक पद्धतीने करावा लागेल.’ असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ही बातमी जरुर पाहा: ‘पुढील 8 ते 10 दिवस मी वाट पाहणार, नंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार’
हे वाचलं का?
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा उल्लेख केला आहे. मात्र, आपण लॉकडाऊनबाबत येत्या 8 ते 10 दिवसातील एकूण परिस्थिती पाहून निर्णय घेऊ. असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे. म्हणजे पुढील पूर्ण आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह विदर्भातील काही महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होत असलेली चिंताजनक वाढ लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनबाबत जनेतेशी संवाद साधला आहे.
अमरावती, अकोला या भागात जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केलं आहे. मुंबईतही ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळणाऱ्या सोसायट्या सील केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आता पुन्हा एकदा लॉकडाउनच्या उंबरठ्यावर येऊन उभा राहिला आहे. असंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणानंतर दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT