‘मिशन बारामती’ भाजपच्या अजेंड्यावर : आणखी एका केंद्रीय मंत्र्यांचा दौरा संपन्न

मुंबई तक

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती सर करण्यासाठी भाजपकडून जोर लावला जात आहे. याचसाठी मिशन बारामतीची आखणी करण्यात आली असून याची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये त्यांचा बारामती दौराही पार पडला. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा त्यांचा बारामती दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्याची पुर्व तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बारामती : आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती सर करण्यासाठी भाजपकडून जोर लावला जात आहे. याचसाठी मिशन बारामतीची आखणी करण्यात आली असून याची जबाबदारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे देण्यात आली आहे. यासाठी सप्टेंबरमध्ये त्यांचा बारामती दौराही पार पडला. त्यानंतर आता त्या पुन्हा एकदा त्यांचा बारामती दौरा निश्चित झाला आहे.

या दौऱ्याची पुर्व तयारी करण्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांचा बारामती दौरा नुकताच संपन्न झाला. पटेल यांनी बारामतीमध्ये फिरताना, कामाचा आढावा घेताना इथल्या नागरिकांशी संवाद साधला. त्यानंतर ते म्हणाले, बारामतीमधील जनता भयभीत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचाच खासदार बारामतीमधून निवडून येईल अशा आशावादही पटेल यांनी व्यक्त केला.

पवारांनी कोणती सहकारी संस्था उभी केली? पटेल यांचा सवाल

२ दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. मला कुठेही विकास दिसला नाही. उलट नागरिकांमध्ये भीती दिसली, असे सांगत शरद पवारांबद्दल बोलताना पटेल म्हणाले, राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना साहेबच म्हणेन; परंतु त्यांनी एकही सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या ऐकिवात नाही. तसंच बारामतीतील नदीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषित पाणी सोडलं जात. मी जेव्हा पुन्हा बारामतीचा दौरा करेन, तेव्हा नदीची पाहणी करणार असल्याचही ते म्हणाले.

बारामती मतदार संघातील स्थानिक नेते सक्षम :

केंद्रातील योजना गावोगावी पोहचवा आणि बारामती लोकसभा मतदार संघ भयमुक्त करा, नक्की भाजपचं कमळ फुलेल. अर्थात हा संकल्प यशस्वी करण्यासाठी या मतदार संघातील स्थानिक नेते सक्षम आहेत. मी केवळ बारामतीमधील कामाला वेग देण्यासाठी आलो आहे आणि येत राहणार आहे. बारामतीत संघटनात्मक काम सुरू असल्याचे समाधान वाटते, असेही पटेल म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp