आजच्या ‘भारत बंद’चा महाराष्ट्रात काय परिणाम?
मुंबई: जीएसटी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज (26 फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना यांनी हा बंद पुकारला आहे. या दरम्यान, बाजारपेठा आणि ट्रान्सपोर्ट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. हा बंद आज सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, असं असलं […]
ADVERTISEMENT

मुंबई: जीएसटी, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती यासारख्या अनेक मुद्द्यांवर आज (26 फेब्रुवारी) भारत बंदची हाक देण्यात आली आहे. देशातील अनेक व्यापारी संघटना, ट्रान्सपोर्ट संघटना यांनी हा बंद पुकारला आहे. या दरम्यान, बाजारपेठा आणि ट्रान्सपोर्ट बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. हा बंद आज सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. मात्र, असं असलं तरीही महाराष्ट्रात या बंदचा सध्या तरी कोणत्याही स्वरुपात परिणाम दिसून येत नाहीए. राज्यातील सर्व वाहतूक आणि बाजारपेठा या सुरुळीत सुरु आहेत.
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींविरोधात असोसिएशनने हा बंद पुकारला आहे. ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट्स वेलफेअर असोसिएशनद्वारे सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद ठेवण्याचं अपील करण्यात केलं आहे. मात्र, राज्यात तरी या बंदचा फारसा परिणाम काही दिसून आलेला नाही.
ही बातमी पाहा: पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हाती? हे लोकांना ठाऊक-अजित पवार
दुसरीकडे देशभरातील जवळजवळ 40 हजार व्यापारी संघटनांनी देखील या बंदला पाठिंबा दिला असल्याचं समजतं आहे. हा बंद पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांसह, जीएसटी, ई-वे बिल यासारख्या अनेक मुद्द्यांवर आहे. यामुळे असोसिएशनशी संबंधित बाजार बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.