Vaccination : १२ वर्षांवरील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ लसीच्या आपातकालीन वापराला मंजुरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

देशातील लसीकरण मोहीमेच्या दृष्टीकोनातून आणखी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. १२ वर्षांवरील मुलांसाठी आपातकालीन वापराला भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला मंजुरी मिळाली आहे. DGCI (Drug Controller General of India) ने ही मान्यता दिली असून ही लस १२ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध होणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे.

ADVERTISEMENT

Zydus Cadila च्या ZyCoV-D या लसीनंतर लहान मुलांसाठी हिरवा कंदील मिळालेली कोवॅक्सिन ही दुसरी लस ठरली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला लहान मुलांच्या लसीसाठी भारत बायोटेकला वेगळी ऑर्डर द्यावी लागणार आहे. कोवॅक्सिनही दोन डोसमध्ये लहान मुलांना दिली जाणार आहे.

याउलट Zydus Cadila ची ZyCoV-D या लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. केंद्र सरकारने कोवॅक्सिन लसीला मान्यता दिली असली तरीही ही लस नेमकी कधी देण्यात येईल याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लसीकरणाला आणखी बळ मिळेल असं बोललं जातंय. जगभरात अमेरिका आणि ब्रिटन यासारख्या प्रगत देशांमध्ये लहान मुलांच्या लसीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतात या लसीकरणाला कधी सुरुवात होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

PM Address to Nation : आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘बूस्टर डोस’, १५-१८ वयोगटातील मुलांसाठी ३ जानेवारीपासून लसीकरण

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT