सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर; भरत गोगावले म्हणाले, ‘4 ते 5 वर्ष ठरणार नाही’
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठाने पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं आहे. या प्रकरणावरील सुनावणी लांबणीवर पडली असून, त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी धक्कादायक विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकी आयोगातील सुनावणीबद्दलही गोगावले यांनी भाष्य केले असून, ‘शिवसेनेचा धनुष्यबाणही आम्ही घेणार’, […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंठपीठाने पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपवलं आहे. या प्रकरणावरील सुनावणी लांबणीवर पडली असून, त्यातच आता शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी धक्कादायक विधान केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे निवडणुकी आयोगातील सुनावणीबद्दलही गोगावले यांनी भाष्य केले असून, ‘शिवसेनेचा धनुष्यबाणही आम्ही घेणार’, असं म्हटलंय.
एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर शिवसेनेनं बैठक बोलावली होती. या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली होती. १६ आमदारांना विधानसभा उपाध्यक्षांनी नोटीसा बजावल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना संघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहोचला.
शिवसेना फूट : सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण घटनापीठाकडे
या प्रकरणाशी संबंधित वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. यात केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीच्या प्रकरणाचाही समावेश आहे. तत्कालिन सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर ही सुनावणी झाली. न्यायालयाने आता हे प्रकरण पाच सदस्यीय खंठपीठाकडे सोपवलं आहे.
Shivsena : ठाकरेंकडून दोन निष्ठावंत मावळ्यांना प्रमोशन : पराग डाकेंवरही नवी जबाबदारी