Sanjay Raut : “ज्यांनी उद्धव साहेबांना उल्लू केलं”, भास्कर जाधव-गुलाबराव पाटील भिडले

मुंबई तक

Sanjay Raut । Bhaskar Jadhav । Gulabrao Patil : संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून विधानसभा आणि विधान परिषदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याच्या चर्चेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात वार पलटवार बघायला मिळाला. (Bhaskar Jadhav And Gulabrao Patil speech in Assembly) संजय राऊतांवर हक्कभंग आणण्यात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut । Bhaskar Jadhav । Gulabrao Patil : संजय राऊत यांनी केलेल्या विधानावरून विधानसभा आणि विधान परिषदेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. संजय राऊतांवर हक्कभंग आणण्याच्या चर्चेत बोलताना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आणि शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यात वार पलटवार बघायला मिळाला. (Bhaskar Jadhav And Gulabrao Patil speech in Assembly)

संजय राऊतांवर हक्कभंग आणण्यात आला. त्यावर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी मत मांडलं. “या सभागृहात, या सभागृहाच्या प्रतिष्ठेबद्दल, या सभागृहाच्या सन्मानाबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य कुणी करावं की करून नये, यापेक्षा करू नये. जर कुणी अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, तर या सभागृहाची उच्च परंपरा जी आहे, त्या परंपरेनुसार काही निर्णय झालेले मान्य करू शकतो.”

“ज्यावेळी सभागृहात हा विषय आला, त्यावेळी मी सभागृहात नव्हतो. मी उशिरा आलो. मी विषयाची माहिती घेतली, पण तो कोणत्या टिपेला पोहोचलाय, कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे, याची माहिती नसल्यामुळे मी शांतपणे बसलो होतो”, असं भास्कर जाधव म्हणाले.

“संजय शिरसाट यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून उल्लेख केला आणि आम्हाला उचकावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझं नाव घेतलं म्हणून मी आपल्याला बोलण्याची परवानगी मागितली. या सभागृहाचा अपमान, सभागृहाबद्दल गैरउद्गार काढणं, केवळ कुणाला तरी परवानगी आहे आणि कुणाला तरी मान्यता आहे असं मानता येणार नाही”, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली.

Sanjay Raut Controversy: भाजप-शिवसेना आमदार खवळले! राऊतांविरुद्ध हक्कभंग

हे वाचलं का?

    follow whatsapp