भीमा कोरेगाव प्रकरण : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची चौकशी आयोगासमोर 6 तास साक्ष

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भीमा कोरेगाव प्रकरणी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची सहा तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं. या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसारमाध्यमांशी काहीही बोलण्यास किंवा कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. सरकारी वकील शिशिर हिरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केलं आहे.

ADVERTISEMENT

आजच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील अॅड. आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज केला दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मात्र नेमके केव्हा हे स्पष्ट करण्यात आले नाही. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते.

1 जानेवारी 2018 ला जेव्हा कोरेगाव भीमाची घटना घडली तेव्ही विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक म्हणून ते काम करत होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात यावे असा मागणी अर्ज आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी केला. त्यावर आयोगाने आदेश केला आहे. तसेच विश्वास नांगरे पाटील यांचं पुराव्याचं प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

1 जानेवारी 2018 ला काय घडलं होतं?

1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या. या घटनांची सुरुवात पुण्याजवळच्या कोरेगाव भीमा, पाबळ आणि शिक्रापूर इथून झाली. या गावांमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनांमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रबंदची हाक दिली होती.

ADVERTISEMENT

रश्मी शुक्ला कोण आहेत?

ADVERTISEMENT

रश्मी शुक्ला महाराष्ट्र कॅडरच्या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्य़ांनी भूगर्भशास्त्र शास्त्रात पदवुत्तर शिक्षण पुर्ण केले आहे.

हैद्राबादच्या नॅशनल पोलीस अकॅडमीतून पास आउट झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र कॅडर जॉइन केलं.

शुक्ला 1996 ते 1999 मध्ये नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक होत्या.

त्यानंतर 1999-2002 नागपूरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम केलं.

2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केलं होतं.

2016 मध्ये रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

2018 पर्यंत त्या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2018 मध्ये रश्मी शुक्ला यांची स्टेट इंटिलिजन्स डिपार्टमेंटच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आलं.

सप्टेंबर 2020 मध्ये शुक्ला यांना ठाकरे सरकारने पोलीस महासंचालकपदी (DG) प्रमोशन दिलं. त्यांची बदली सिव्हिल डिफेन्सच्या प्रमुख म्हणून करण्यात आली.

फेब्रुवारी २०२१ मध्ये त्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT