Bhima Shankar ज्योतिर्लिंग आसामने पळवलं? BJP मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीने वाद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Bhima Shankar Jyotirlinga :

ADVERTISEMENT

खेड : आसाम (Assam) सरकारच्या एका जाहिरातीवरुन सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) वाद निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर (Bhima Shankar) देवस्थान हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग मानले जाते. मात्र हे भीमाशंकर देवस्थान आसाममध्ये असल्याचा दावा करणारी एक जाहिरात आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीवरुन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांच्यासह शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी राज्य सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे. (Assam Chief Minister Himanta biswa Sharma has said that the Bhima Shankar temple is in Assam)

नेमकं काय आहे या जाहिरातीमध्ये?

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या पर्यटन विभागाकडून १४ फेब्रुवारीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ‘भारतातील सहावे ज्योतिर्लिंग स्थळ, कामरुपच्या डाकिनी पर्वतावर आपलं स्वागत आहे’ असा आशय असणारी जाहिरात आहे. याच जाहिरातीमध्ये विविध ज्योतिर्लिंग स्थळांची यादी देखील देण्यात आली आहे. यात भीमाशंकरच्या नावापुढे स्थळाचा उल्लेख ‘डाकिनी’मधील भीमाशंकर असा करण्यात आला आहे. याशिवाय जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री हिमंत बिश्व शर्मा यांचा फोटोही आहे.

हे वाचलं का?

BBC कार्यालयात Income Tax टीम, फोन जप्त करुन कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी

याच जाहिरातीमुळे वादाला सुरुवात झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील ‘भीमाशंकर’ला मानले जाते. मात्र आसाम सरकारकडून ऐन महाशिवरात्रीच्या तोंडावर ‘भीमाशंकर’ आसाममध्ये असल्याचं भासवून देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुग गिळून शांत का बसले आहेत? असा सवाल दिलीप मेहिते पाटील यांनी केला.

ADVERTISEMENT

एकीकडे राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्याचा प्रकार ताजं असतानाच आता राज्यातील देवस्थानही पळविण्याचा घाट घातला जात आहे. आता भिमाशंकर चोरण्याचा प्रयत्न कराल तर आमच्या सहनशीलतेचा अंत पहावू नका. राज्य सरकारने हा प्रकार थांबवावा, अन्यथा परिणामांना सोमोरे जावं लागेल अशा शब्दात दिलीप मोहिते पाटील यांनी संताप व्यक्त केला.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis यांना हात जोडून विनंती की… : सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

अमोल कोल्हे काय म्हणाले?

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला दावा दुर्देवी आहे. महाराष्ट्रातील शिवभक्तांना आणि भाविकांना श्रद्धास्थान असेललं भीमाशंकर मंदीर आहे. याला मागील १२०० ते १४०० वर्षांपासूनचा इतिहास आहे. हे मूळ हेमडपंथी असेललं मंदीर मागील कित्येक शतकांपासून १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून गणलं गेलं आहे.

शिवलिलामृतामध्येही या मंदीराचा उल्लेख भीमा नदीच्या उगमस्थानी असाचं आहे. या भीमा नदीचा उगम कुठेही आसाममधील डाकिनी पर्वतावर होत नाही. तो महाराष्ट्रातील खेड तालुक्यातील भीमाशंकरमध्ये होतो. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या दाव्यावर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्वरीत हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT