Jalgaon district bank: एकनाथ खडसेंचा गुलाबराव पाटलांकडून ‘कार्यक्रम’
-मनीष जोग, जळगाव Eknath Khadse Jalgaon district bank : जळगाव जिल्ह्यातील राजकारणाने पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधून घेतलं. याला कारण ठरलं जळगाव जिल्हा बँक निवडणूक. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. हे घडलं ते राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे. खडसेंना जिल्हा बँक का गमवावी लागली? याचे मास्टरमाईंड ठरलेत शिंदेंच्या गोटातले गुलाबराव पाटील. पाटलांच्या […]
ADVERTISEMENT
-मनीष जोग, जळगाव
Eknath Khadse Jalgaon district bank : जळगाव जिल्ह्यातील राजकारणाने पुन्हा एकदा राज्याचं लक्ष वेधून घेतलं. याला कारण ठरलं जळगाव जिल्हा बँक निवडणूक. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसलाय. हे घडलं ते राष्ट्रवादीतील बंडखोरीमुळे. खडसेंना जिल्हा बँक का गमवावी लागली? याचे मास्टरमाईंड ठरलेत शिंदेंच्या गोटातले गुलाबराव पाटील. पाटलांच्या गेममुळे जळगावमध्ये बाजी पलटली.
जळगाव जिल्हा बॅके अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांचे नाव निश्चित झाले असतानाही राष्ट्रवादीचे संजय पवार यांनी बंडखोरी करत आयत्या वेळी शिंदे गटाच्या मदतीने अध्यक्षपदासाठी अर्ज भरला अन् इथेच कार्यक्रम झाला. कारण या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान झालं. संजय पवार यांना ११ मते पडल्याने अध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. संजय पवार यांची अध्यक्षपदी झालेली निवड ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
महाविकास आघाडी फुटली, खडसेंना दुसरा धक्का
जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आलं. दरम्यान, संजय पवार यांनी शिंदे गटाची मदत घेतली. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच बंडखोरी झाल्यानं निकालाची उत्सुकता वाढली होती. एकूण 21 मतांपैकी 11 मते ही संजय पवार यांना, तर 10 मते रवींद्र पाटील यांना पडली.
त्यामुळे चुरशीच्या झालेल्या या लढतीत एका मताने संजय पवार यांचा विजय झाला आणि जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद संजय पवार यांच्याकडे आलं.
ADVERTISEMENT
‘फक्त आरोप झाले तरी नाथाभाऊंनी राजीनामा दिला’; मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ खडसे काय म्हणाले?
ADVERTISEMENT
‘आमच्यातच गद्दारी झाली’, खडसे भडकले
निकालानंतर बोलताना एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त केला. “सर्वांना एकत्र ठेवण्यात आम्हाला अपयश आलं. काँग्रेसची मतं फुटली. आमच्यातच गद्दारी झाली व आमचा नाईलाज झाला. शिवसेना व काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीतील लोकांकडून आम्हाला अपेक्षा नव्हती, त्यांनी विश्वासघात केला. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला धक्का लागला”, असं खडसेंनी म्हटलं आहे.
“अजित पवार हे माझे नेते आहेत. सहकारात पक्ष नसतो, मात्र या निवडणुकीत मला भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गटाचे व भाजपचे आमदार या सर्वांनी मला न्याय दिला. खऱ्या अर्थाने जिल्हा बँकेत मला 20 वर्षांनतर न्याय मिळाला आहे. मी समाधानी आहे”, असं जळगाव जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय पवार यांनी सांगितलं.
गुलाबराव पाटलांचा करेक्ट कार्यक्रम
जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसेंचं वर्चस्व होतं. मात्र, गेल्या काही वर्षात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या वर्चस्वाला धक्के देण्यास सुरुवात केली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महाजन-पाटील यांनी एकत्र येत खडसेंचं पानीपत केलं. त्यानंतर आताही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांना बळ देत खडेंना शह दिला.
‘माणूस हवेत उडायला लागला की,…’,गिरीश महाजन यांची खडसेंवर टीका
जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंवर टीकेचे बाण डागले. “माणूस हवेत उडायला लागला की, तो जोरात खाली आपटतो. खडसेंचा अहंकार जास्त झाला होता तो आज उतरला असून बाहुबली म्हणून घेणाऱ्या खडसेंना आम्ही जागा दाखवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये असणारे खडसे आज कुठे येऊन पडलेत”, असं म्हणत गिरीश महाजनांनी खडसेंना डिवचलं.
ADVERTISEMENT