संपूर्ण कुटुंबाची हत्या, नंतर सामूहिक बलात्कार पण आता नराधमांची सुटका, काय आहे बिल्किस बानो प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गोध्रा: गोध्रा घटनेनंतर २००२ मध्ये गुजरातमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सर्व ११ दोषींची सोमवारी गोध्रा उप कारागृहातून सुटका करण्यात आली. गुजरात सरकारने त्यांच्या माफी धोरणानुसार त्यांची सुटका करण्यास मान्यता दिली. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालयाने २१ जानेवारी २००८ रोजी बिल्किस बानोच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या आणि सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवली. या दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त कारावास भोगला, त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने त्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

पंचमहालचे आयुक्त सुजल मायत्रा यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला त्याच्या शिक्षेवर माफीचा विचार करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली. मायत्रा हे समितीचे प्रमुख होते. काही महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकरणातील सर्व ११ दोषींना माफी देण्याच्या बाजूने एकमताने निर्णय घेतल्याचे मायत्रा यांनी सांगितले. ही शिफारस राज्य सरकारकडे पाठवण्यात आली असून काल आम्हाला त्यांच्या सुटकेचे आदेश मिळाले आहेत.

हे वाचलं का?

बिल्किस बानो प्रकरण काय आहे?

3 मार्च 2002 रोजी गोध्रा दंगलीनंतर दाहोद जिल्ह्यातील लिमखेडा तालुक्यातील रंधिकपूर गावात बिल्किस बानोच्या कुटुंबावर जमावाने हल्ला केला होता. त्यावेळी बिल्किस पाच महिन्यांची गर्भवती होती. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली. अन्य सहा सदस्य घटनास्थळावरून पळून गेल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना 2004 मध्ये अटक करण्यात आली होती.

३ मार्च २००२ हा दिवस बिल्किस बानोसाठी आयुष्य उद्ध्वस्त करणारा होता. गर्भात असलेल्या पाच महिन्यांच्या बाळाच्या स्वागताची तयारी बिल्किस आणि तिचे कुटुंब करत होते. नवीन पाहूणा त्यांच्या घरी येणार होता, पण त्याआधी गोध्रा घटनेनंतरच्या गुजरात दंगलीने सर्व काही उद्ध्वस्त केले. दंगलखोरांच्या जमावाने बिल्कीसच्या घरात घुसून तिच्या डोळ्यांसमोर संपूर्ण कुटुंबाचा निर्दयपणे नाश केला. दंगेखोर इथेच थांबले नाही, त्यांनी बिल्कीसवर अत्याचार केला. तिच्यावर एकामागून एक अनेकांनी सामूहिक बलात्कार केला. वेदनेने ती बेहोश झाली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा न्यायासाठी प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली. तिच्या दोषींना जन्मठेपेची शिक्षा झाली पण आता गुजरात सरकारने त्यांची तुरुंगातून सुटका केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT