औरंगाबादची युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता; पोलिसांकडून शोध सुरू, घर सोडण्यापूर्वी काय घडलं?

मुंबई तक

युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेली औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी बिंदास काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती अद्याप परतलेली नाही. तिच्या आईवडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सोशल मीडियावरून तिला परत येण्याचं आवाहन केलं आहे. औरंगाबादमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

युट्यूब, इन्स्टाग्रामवर कोट्यवधी फॉलोअर्स असलेली औरंगाबादमधील प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या बेपत्ता झाली आहे. ९ सप्टेंबर रोजी दुपारी बिंदास काव्या घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती अद्याप परतलेली नाही. तिच्या आईवडिलांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, सोशल मीडियावरून तिला परत येण्याचं आवाहन केलं आहे.

औरंगाबादमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली बिंदास काव्या बेपत्ता झाल्यानं खळबळ उडाली आहे. बिंदास काव्या बेपत्ता झाल्याची माहिती तिच्या आईवडिलांनी दिली. बिंदास काव्या शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती परत आलीच नाही.

बिंदास काव्या उशिरापर्यंत परत न आल्यानं आईवडिलांनी तिचा शोध घेतला. तिच्या मित्रांच्या घरी आणि आजूबाजूला चौकशी केल्यानंतरही ती सापडली नाही. त्यानंतर बिंदास काव्याच्या आईवडिलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.