Chandrapur Bird Flue : चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूची एन्ट्री... प्रशासन अलर्ट मोडवर, 10 किमीचा परिसर

मुंबई तक

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संक्रमित कोंबड्या वैज्ञानिक पद्धती वापरून नष्ट केल्या जातील. उरलेले पशुखाद्य आणि अंडी देखील नष्ट होतील.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चंद्रपूरमध्ये कोंबड्यांमध्ये आढळला बर्ड फ्लूचा संसर्ग

point

पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाल्यानंतर केली होती तपासणी

चंद्रपूरमध्ये बर्ड फ्लूच्या एन्ट्रीनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.  मांगली गावाच्या आजूबाजूचा 10 किमीचा परिसर 'अलर्ट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी, जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संदर्भात आदेश जारी केले आहेत.

गेल्या महिन्यात 25 जानेवारीला ब्रह्मपुरी तहसीलमधील मांगली गावात एका पोल्ट्री फार्ममध्ये पक्ष्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. या पथकाने घटनास्थळावरुन नमुने घेतले आणि ते पुणे आणि भोपाळला चाचणीसाठी पाठवले. यानंतर, जेव्हा लॅबमधून अहवाल आला तेव्हा त्यात बर्ड फ्लू (एव्हियन इन्फ्लूएंझा H5N1) असल्याचं स्पष्ट झालं.

प्रशासनाला जेव्हा अहवाल मिळाला, तेव्हा प्रशासनाने सतर्क होत काही निर्णय घेतले. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि डीडीएमए अध्यक्षांनी मांगली गाव आणि त्याच्या आजूबाजूच्या 10 किमी परिघाचा परिसर 'अलर्ट झोन' म्हणून घोषित केला. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, झोनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब केला जात आहे.

हे ही वाचा >> 'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, मी सुद्धा एका सेकंदात...' मंत्री प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

दरम्यान, मांगली, गेवरलाचक आणि जुनोनाटोलीत पोल्ट्री बर्ड रॅपिड रिस्पॉन्स टीममार्फत संक्रमित पक्ष्यांना मारले जाईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार संक्रमित कोंबड्या वैज्ञानिक पद्धती वापरून नष्ट केल्या जातील. उरलेले पशुखाद्य आणि अंडी देखील नष्ट होतील.

हे वाचलं का?

    follow whatsapp