फडणवीस सोडून कुणालाही मुख्यमंत्री करायला तयार होते अमित शाह?
2019 च्या नोव्हेंबर महिन्यात पहाटे झालेला शपथविधी महाराष्ट्र कधीही विसरलेला नाही. या घटनेला दीड वर्ष लोटून गेल्यानंतर आता एक बातमी समोर येते आहे.. ही बातमी अशी आहे की भाजपने त्यावेळी म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची भाजपची तयारी होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडून कुणालाही मुख्यमंत्रीपद देण्याची अमित शाह यांची तयारी होती […]
ADVERTISEMENT
2019 च्या नोव्हेंबर महिन्यात पहाटे झालेला शपथविधी महाराष्ट्र कधीही विसरलेला नाही. या घटनेला दीड वर्ष लोटून गेल्यानंतर आता एक बातमी समोर येते आहे.. ही बातमी अशी आहे की भाजपने त्यावेळी म्हणजेच 2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्याची भाजपची तयारी होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सोडून कुणालाही मुख्यमंत्रीपद देण्याची अमित शाह यांची तयारी होती असं सूत्रांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
भाजपमधल्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये विधानसभा निवडणूक निकालानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह हे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांचं सरकार महाराष्ट्रात यावं असं अमित शाह यांना वाटत होतं, त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस वगळून राष्ट्रवादीच्या पसंतीच्या भाजपच्या कोणत्याही नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याचीही तयारी दर्शवली होती. अमित शाह यांनी हे शरद पवारांना कळवलंही होतं असंही भाजपच्या सूत्राने म्हटलं आहे. ही तयारी अजूनही कायम आहे. आपण खेळलेल्या या खेळीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वाद निर्माण होतील का? हेदेखील चाचपण्याचं काम अमित शाह करत आहेत असंही या सूत्राने म्हटलं आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फडणवीसांना झुकतं माप दिलं आहे त्यामुळे चर्चा अद्याप पुढे सरकलेली नाही.
हे वाचलं का?
आठवड्याभरापूर्वीच अमित शाह हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. मी बंद दाराच्या आड कोणतंही काम करत नाही, जे काही करायचं ते छातीठोकपणे करतो, जाहीरपणे राजकारण करणं ही माझी पद्धत आहे. मी उद्धव ठाकरेंना बंद खोलीत कोणतेही आश्वासन दिले नव्हते या गोष्टीचा उल्लेख अमित शाह यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात केला. त्यापाठोपाठ आता 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शाह यांनी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली होती असं समजतं आहे.
पाहा मुंबई तकचा खास व्हिडीओ
ADVERTISEMENT
आणखी काय म्हणाले होते अमित शाह?
ADVERTISEMENT
“मी महाराष्ट्रातील जनतेला आज हे सांगण्यासाठी आलो आहे की तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या स्वार्थापोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारला जनादेश मिळाला होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन मोडलं त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीशकुमार होणार, आमच्या जास्त जागा येऊनही नितीशकुमारच यांनाच मुख्यमंत्री केलं ” असंही उदाहरण अमित शाह यांनी दिलं आहे.
काय घडलं होतं त्या दिवशी?
23 नोव्हेंबर 2019 हाच तो दिवस होता ज्यादिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. भल्या सकाळी त्यांनी शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकत्र येऊन सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालेलं असताना महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या या प्रसंगाने सगळ्यांचेच विविध अंदाज चुकवले होते. त्यानंतर शरद पवारांनी काय करीश्मा केला आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार कसं आलं हे महाराष्ट्राला ठाऊक आहेच. या घटनेला जवळपास सव्वा वर्ष उलटल्यानंतर भाजपच्या एका सूत्राने ही माहिती दिली आहे की महाराष्ट्रात भाजपचं सरकार येऊ शकलं असता त्यासाठी फडणवीस सोडून कुणालाही मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी अमित शाह यांनी दाखवली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या प्रक्रियेला पसंती दर्शवलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT