NCP Leader Eknath Khadse: ‘भाजपचा OBC नेत्यावर फार जुना राग आहे’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: ‘भाजपचा एकनाथ खडसे या ओबीसी नेत्यावर फार जुना राग आहे. एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये फार वाढू दिले गेले नाही. त्यामुळे ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्यात आले.’ असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केला आहे.

ADVERTISEMENT

‘एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील.’ असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीला बोलावल्यानंतर जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांच्याविरोधात हे कुभांड रचले जात असल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलं का?

‘एकनाथ खडसे यांच्यावर ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात तथ्य अद्याप आढळलेले नाही. किंवा कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाही. एक जागा त्यांनी रितसर घेतली त्याबाबत निर्णय झालेला आहे. चौकशी समितीलाही त्यात काही चूक आढळली नाही. पण त्यामध्ये कुभांड रचून या सर्व एजन्सीमार्फत राजकीयदृष्टया अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत.’ असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावलं आहे. ‘ही चौकशी राजकीय हेतूने केली जाते आहे. मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आलो त्यामुळे माझ्याविरोधात कारवाया सुरू झाल्या. मात्र चौकशीला पूर्ण सहकार्य करणार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.’

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर, चौकशीमागे राजकीय वास येत असल्याची प्रतिक्रीया

ADVERTISEMENT

काय आहे भोसरीचं भूखंड प्रकरण?

2016 मध्ये एकनाथ खडसे हे राज्याचे महसूल मंत्री होते. त्यावेळी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथे भूखंड खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला गेला. एकनाथ खडसे यांनी भोसरी येथील सर्व्हे क्रमांक 52/2 अ/ 2 मधील तीन एकरचा भूखंड त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावे हा खरेदी केला.

या भूखंडाचा व्यवहार 3 कोटी 75 लाख रूपयांना अकानी नावाच्या व्यक्तीकडून खरेदी केला. पण या भूखंडाचा सातबारा MIDC च्या नावावर होता. त्यामुळे खडसे यांनी पदाचा गैरवापर करून भूखंड खरेदी केल्याचा आरोप झाला. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावडे यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. एप्रिल 2017 मध्ये ACB ने म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि अकानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. चौकशीही सुरू केली. मात्र 2018 मध्ये त्यांना क्लिन चिट देण्यात आली. दरम्यान निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यासाठी झोटिंग समितीही नेमण्यात आली. या समितीमार्फत प्रकरणाची चौकशी झाली. त्यानंतर आता ईडीकडून चौकशी सुरू आहे. याआधीही एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT