क्रूझवरील ड्रग्स पार्टीत BJP नेत्याचा मेहुणा; पत्रकार परिषदेत व्हीडिओच दाखवणार: नवाब मलिक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुंबईत क्रूझ ड्रग्स प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)जी कारवाई केली त्याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. एवढंच नव्हे तर आता त्यांनी एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक असा आरोप देखील केली आहे.

‘क्रूझ ड्रग्स पार्टीत करण्यात आलेल्या छापेमारीत 10 जणांना पकडण्यात आलं होतं. त्यापैकी दोघांना सोडण्यात आलं. कारण यामधील एक जण हा मुंबईतील भाजपच्या नेत्याचा मेहुणा होता. याबाबत मी उद्या (9 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेणार असून यामध्ये आपल्याला व्हीडिओच दाखवणार आहे.’ असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक काय-काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

क्रूझ ड्रग्स प्रकरणी नवाब मलिक यांनी अनेक सवाल उपस्थित करणं सुरु केलं आहे. आज देखील त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

‘क्रूझवर ज्या 10 लोकांना पकडलं होतं त्यापैकी 2 लोकांना सोडलं. ज्या दोघांना सोडण्यात आलं त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा आहे. याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत मी करणार आहे.’

ADVERTISEMENT

‘त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले. हे जाणीवपूर्वक करण्यात आलं. सगळा खरा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले का?’ असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

ADVERTISEMENT

‘भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव मी उद्या घोषित करणार आहे. NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी सुरुवातीला मीडियाला बाईट देताना सांगितलं होतं की, 8 ते 10 लोकांना पकडले आहे. त्यांच्या याच बाइटवर मी प्रश्न विचारला होता की, 8 जणांना पकडलं होतं की, 10 जणांना? कारण जर एक अधिकारी संपूर्ण कारवाई करतोय तर तो अधिकारी असा अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो?’

‘भाजपाचा तो हायप्रोफाईल नेता असून त्यानेच सगळं गॉसिप केले आहे. पहिल्यांदा म्हटले की, यामध्ये राजकीय व्यक्ती आहे त्यानंतर मग हा पॉलिटिकल कनेक्शन असणारा माणूस सुटलाच कसा?’ असा सवाल करत नवाब मलिकांनी या प्रश्नी NCB ला उत्तर द्यावं लागेल असंही म्हटलं आहे.

Mumbai Drugs Case: आर्यनला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं? ‘त्या’ दोघांमुळे विचारला जातोय प्रश्न

नेमकं प्रकरण काय?

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. क्रूझवर ड्रग पार्टी आयोजित होणार असल्याची माहिती एनसीबीला आधीच मिळाली होती त्यामुळे त्याच आधारे त्यांनी हा छापा टाकला असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या छापेमारीक एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही लागला. अनेक तासांच्या चौकशीनंतर आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर कोर्टाने त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावली होती. पण काल झालेल्या सुनावणीत 7 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे.

त्यामुळे आर्यनसह इतर सर्व आरोपींच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. यानंतर स्पष्ट होईल की, आर्यन खानला कोर्टाकडून जामीन मिळणार की नाही.

मुंबईतील क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सुरुवातीला किला कोर्टाने आरोपी आर्यन खान याच्यासह दोन आरोपींना एक दिवसासाठी NCB ची कस्टडी सुनावली होती. त्यानंतर तीन दिवसांची कस्टडी पुन्हा वाढवून देण्यात आली होती. पण आता ही कस्टडी वाढवून देण्यास कोर्टाने नकार दिला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT